संरक्षण मंत्र्यांची घोषणा : १०१ संरक्षण सामुग्रीची आयात करणार बंद

संरक्षण मंत्र्यांची घोषणा : १०१ संरक्षण सामुग्रीची आयात करणार बंद

राजनाथ सिंह; संरक्षणमंत्री

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यापुढे देशात १०१ संरक्षण सामुग्रीची आयात बंद करणार असल्याचे निर्देश दिले आहेत. या सामुग्रींची यादी अद्याप त्यांनी जाहीर केली नाही. परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या योजनेला पाठबळ देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यापुढे ही संरक्षण सामुग्री देशातच बनवली जाईल, असेही सूत्रांकडून समजते.

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज, रविवारी सकाळी १० वाजता महत्त्वाची घोषणा करणार आहेत. याबाबत संरक्षण मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवरून माहिती देण्यात आली आहे. लडाखच्या अॅक्चुअल लाईन ऑफ कंट्रोल (LAC) वर चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संरक्षण मंत्रालय लवकरच निगेटिव्ह आर्म्स लिस्ट बनवणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगितली जात आहे. तसेच या अंतर्गत काही शस्त्रांच्या आयातीवर निर्बंध घातले जातील.

First Published on: August 9, 2020 10:14 AM
Exit mobile version