धक्कदायक! सूनेने सासू – सासऱ्याचा केला खून

धक्कदायक! सूनेने सासू – सासऱ्याचा केला खून

Workman dies of electric shock

देश एकीकडे कोरोना संकटांचा सामना करत आहे. मात्र, दुसरीकडे अशा परिस्थितही अनेक गुन्हे घडत असल्याचे समोर येत आहे. दिल्लीमध्ये अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सूनेने चक्क सासू – सासऱ्याचा खून केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार; दिल्लीच्या छावला येथे सासू- सासऱ्यांसोबत राहणाऱ्या कविता (३५) या सूनेने आपल्या सासू – सासऱ्यांचा खून केल्याचे समोर आले आहे. ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, या घटनेच्या वेळी आरोपी कविताचा पती आणि दोन मुले देखील समोर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली. मात्र, यामध्ये दोघांचा देखील मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या खूनाबाबत आरोपी कविता हिच्याकडे विचारणा केली असता सासू – सासऱ्यांच्या प्रोपर्टीकरता ही हत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, याघटनेची अधिक चौकशी केली असता पोलिसांकडून देखील टाळाटाळ केली जात आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – Coronavirus: पावसाळ्यात पुन्हा एकदा कोरोनाची लाट येऊ शकते, शास्त्रज्ञांचा दावा


 

First Published on: April 24, 2020 7:12 PM
Exit mobile version