The Kashmir Files : काश्मीरी पंडितांना चित्रपटाची नाही तर पुनर्वसनाची गरज, द काश्मीर फाईल्सवरून केजरीवालांनी सुनावले

The Kashmir Files : काश्मीरी पंडितांना चित्रपटाची नाही तर पुनर्वसनाची गरज, द काश्मीर फाईल्सवरून केजरीवालांनी सुनावले

द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून सध्या जागतिक वातावरण तापलं आहे. या चित्रपटावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खडेबोल सुनावले आहे. काश्मीरी पंडितांना चित्रपटाची नाही तर पुनर्वसनाची गरज आहे, असं अरविंद केजरीवाल म्हणाले. या चित्रपटावरून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केजरीवालांनी केला आहे.

इंग्रजी वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत केजरीवाल म्हणाले की, काश्मीरमध्ये एक मोठी शोकांतिका घडली आहे. ३२ वर्ष उलटल्यानंतरही सरकार काश्मीर पंडितांना सांगतंय की, आम्ही तुमच्यासाठी चित्रपट बनवला आहे.

गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्री केजरीवाल यांनी द काश्मीर फाईल्स चित्रपट करमुक्त केल्याबद्दल भाजपवर निशाणा साधला होता. त्याचबरोबर या चित्रपटाची कमाई पंडितांच्या पुनर्वसनासाठी वापरावी आणि युट्यूबवर प्रदर्शित करावा. तसेच त्याला कमाईचे साधन बनवू नये, असे केजरीवाल म्हणाले.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना हा चित्रपट युट्यूबवर प्रदर्शित करावा, असं केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्हटलं होतं. हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची गरज नसून या चित्रपटाला प्रत्येकजण फ्रीमध्ये पाहू शकतो, असं केजरीवाल म्हणाले.

काय म्हणाले केजरीवाल ?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत भाजपवर प्रश्न करत द कश्मीर फाईल्स हा चित्रपट यूट्यूबवर टाकला पाहिजे, अशी टीका केली होती. तेव्हा ते म्हणाले की, हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी करण्यापेक्षा विवेक अग्निहोत्री यांना तो YouTube (#YouTubeParDalDo) वर टाकण्यास सांगावे. त्यामुळे तो सगळ्यांसाठी फ्री होईल आणि त्याला सर्व जण पाहू शकतील.

विवेक अग्निहोत्रीचे उत्तर

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितले. तेव्हा ते म्हणाले की, या फालतू गोष्टीवर मला खरंच काही बोलायची गरज आहे का? ते स्टीव्हन स्पीलबर्गला त्याचा चित्रपट शिंडलर्स लिस्ट यूट्यूबर ठेवायला सांगेल का? मी माझ्या छोट्या चित्रपटांची शिंडलर लिस्टसोबत तुलना करतचं नाही.


हेही वाचा : उकाड्यामुळे राज्यात रेकॉर्डब्रेक विजेची मागणी, महावितरणचा ग्राहकांना अलर्ट!


 

First Published on: March 28, 2022 8:12 PM
Exit mobile version