दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांचे ट्विट, म्हणाले सीबीआयचे स्वागत…

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांचे ट्विट, म्हणाले सीबीआयचे स्वागत…

दिल्ली – काही दिवसांपासून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया CBIचियी रडारवर आहेत. त्यांनी दावा केला आहे की, सीबीआय उद्या त्यांचे बँक लॉकर तपासण्यासाठी येणार आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

ट्वीटमध्ये काय? –

ट्वीटमध्ये उद्या सीबीआय आमचे बँक लॉकर पाहण्यासाठी येत आहे. 19 ऑगस्ट रोजी माझ्या घरी 14 तासांच्या छाप्यात काहीही सापडले नाही, लॉकरमध्येही काही सापडणार नाही. सीबीआयचे स्वागत आहे. तपासात मी आणि माझे कुटुंब पूर्ण सहकार्य करू, असे म्हंटले आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या निवासस्थानावर छापा –

दिल्लीतील बहुचर्चित मद्य धोरणातील कथित घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआयने 19 ऑगस्ट रोजी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर छापा टाकला होता. सिसोदिया दिल्लीचे उत्पादन शुल्क विभाग हाताळतात. सुमारे 14 तास चाललेल्या या छाप्यात सीबीआयने मनीष सिसोदिया यांचा फोन आणि संगणक जप्त केला होता. याप्रकरणी सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्यासह 15 जणांविरुद्ध एफआयआरही नोंदवला आहे.

काय आहे प्रकरण –

दिल्लीच्या नवीन मद्य धोरणात अनियमितता असल्याचा दिल्लीच्या मुख्य सचिवांच्या अहवाला दिला होता. यानंतर नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी गेल्या महिन्यात सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. नोव्हेंबरमध्ये आणलेल्या धोरणांतर्गत दारू दुकानाचे परवाने खासगी व्यापाऱ्यांना देण्यात आले. या दारू धोरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत.

First Published on: August 29, 2022 8:20 PM
Exit mobile version