दिल्ली विधानसभा: निवडणूक जिंकत अरविंद केजरीवाल बायकोला देणार वाढदिवसाचं गिफ्ट

दिल्ली विधानसभा: निवडणूक जिंकत अरविंद केजरीवाल बायकोला देणार वाढदिवसाचं गिफ्ट

सध्या दिल्ली विधानसभा निवडणूक २०२० मतमोजणी सुरू आहे. लवकरच निकाल घोषीत केला जाईल. सध्या आप ७० पैकी ५८ जागांवर आघाडीवर आहे. आघाडीच्या निकानुसार पुन्हा एकदा दिल्लीत आम आदमी पक्षाचं सरकार येणार हे निश्चित झालं आहे. आप ५८ तर भाजपा २० जागांवर आघाडीवर आहे. कॉँग्रेस उमेदवार पिछाडीवर आहेत.
सध्या आपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाच वातावरण आहे. ‘लगे रहो केजरीवाल’ या गाण्यावर कार्यकर्ते नाचताना दिसत आहेत. सध्या निकालानंतर विजयाची जय्यत तयारी आपचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत.

पण आज हा दिवस केजरीवालांसाठी दोन गोष्टींसाठी खास आहे. कारण आज केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणार आहेत तर दुसरीकडे केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे निवडणूक जिंकत केजरीवाल आपल्या बायकोला वाढदिवसाचं खास गिफ्ट देणार हे नक्की.

आपच्या विजयामुळे सुनीता केजरीवाल यांचा वाढदिवस खास साजरा झाला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या घरी कार्यकर्त्ये जमायला सुरूवात झाली आहे. अरविंद केजरीवाल यांना निवडणूक जिंकल्याबद्दल आणि त्यांच्या पत्नी यांना वाढदिवसानिमित्त सगळे शुभेच्छा देत आहेत.

First Published on: February 11, 2020 12:53 PM
Exit mobile version