दिल्लीच्या आरोग्यमंत्र्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; आज मिळणार डिस्चार्ज

दिल्लीच्या आरोग्यमंत्र्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; आज मिळणार डिस्चार्ज

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. काही दिवसांपुर्वी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सत्येंद्र जैन यांनी स्वतःला आयसोलेट केले होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याने मंगळवारी १६ जून रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

त्यांना राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते, पण त्यांची तब्येत फारशी सुधारली नाही. त्यानंतर त्यांना साकेतच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्याच्यावर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यात आले. हळूहळू, त्यांची तब्येत सुधारणा होऊ लागली. तसेच आज त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


दिल्लीचे आरोग्यमंत्री रुग्णालयात दाखल; श्वासोच्छवासाचा त्रास
First Published on: June 26, 2020 6:33 PM
Exit mobile version