Exit Poll : दिल्ली महापालिकेत सत्तांतर होणार, आपचा विजय जवळपास निश्चित

Exit Poll : दिल्ली महापालिकेत सत्तांतर होणार, आपचा विजय जवळपास निश्चित

अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : दिल्ली एमसीडी निवडणुकीत आम आदमी पार्टीला सर्वाधिक जागांवर विजय मिळेल, असा अंदाज दोन वृत्तवाहिनींच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. गेली १५ वर्षे येथे भाजपची सत्ता आहे. मात्र या निवडणुकीत मतदारांनी भाजपला पसंती दिलेली नाही, असे एक्झिट पोल सांगतो.

आज तक वृत्तवाहिनीच्या एक्झिट पोलनुसार, एमसीडीतील २५० जागांपैकी १४९ ते १७१ जागांवर आपला विजय मिळेल. तर भाजपला ६९ ते ९१ जागांवर समाधान मानावे लागेल. टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार आपला १४६ ते १५६ जागा मिळतील, तर भाजपला ८४ ते ९४ जागांवर यश मिळेल. काँग्रेसला मात्र या निवडणुकीत समाधानकारक यश मिळणार नाही. काँग्रेसला १० किंवा त्यापेक्षा कमी जागांवर विजय मिळेल. तसेच अन्य स्थानिक पक्षांना पाच ते नऊ जागांवर यश मिळेल, असा अंदाज या दोन्ही वृत्तवाहिनींच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

एमसीडी येथे गेली १५ वर्षे भाजपची सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंल केजरीवाल यांनी भ्रष्टाचार संपवण्याचे आश्वासन मतदारांना दिले. याचा प्रभाव मतदारांवर पडला आहे. त्यामुळे मतदार आपलाच कौल देतील, असे एक्झिट पोलमधून स्पष्ट होत आहे.

गुजरात, हिमाचलसोबतच एमसीडीची निवडणूक पार पडली. सोमवारी गुजरात व हिमाचलचा एक्झिट पोल समोर आला. यामध्ये भाजपला गुजरातमध्ये स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुजरात निवडणुकीत आपने जोरदार प्रचार केला. मात्र तेथे आपला अपेक्षित यश मिळणार नाही, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. आपमुळेच गुजरातमध्ये काँग्रेसला फटका बसणार आहे, असे बोलले जात आहे. काँग्रेसने तसा जोरदार प्रचारही गुजरात निवडणुकीत केला नाही. एवढचं काय तर शेवटच्या टप्यातील मतदानात स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केले. मात्र काँग्रेसचा एकही मोठा मतदानासाठी गेल्याचे दिसले नाही. त्यामुळे काँग्रेसलाही निकालाच अंदाज आला असावा, असे बोलले जात आहे. दरम्यान, एमसीडीमधील आपचा विजय भाजपला धक्का देणारा ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

First Published on: December 5, 2022 10:50 PM
Exit mobile version