पॉर्न साइटवर महिलेचे फेक अकाऊंट बनवणाऱ्याला अटक

पॉर्न साइटवर महिलेचे फेक अकाऊंट बनवणाऱ्याला अटक

प्रातिनिधिक फोटो

पॉर्न साईट्सवर महिलेचे खोटे अकाऊंट बनवणाऱ्या २९ वर्षीय कनिष्ठ अभियंत्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. या अकाऊंटमध्ये अभियंत्याने तिचा मोबाईल नंबरही टाकला. अकाऊंट बनवलेल्या महिलेबरोबर त्याचा साखरपूडा झाला असून लवकरच त्यांचे लग्न होणार होते. लग्न करण्याची इच्छा नसल्याने त्याने तिला त्रास देण्यासाठी असे केले असल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांनी अभियंत्याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाईस सुरुवात केली आहे. पीडित महिला ही एअर हॉस्टेस म्हणून कार्यरत आहे तर तरुण मिलिटरी इंजिनिअर सर्व्हिसेसमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होता. जून महिन्यात या दोघांच्या कुटुंबीयांची मॅट्रीमोनी साईटवर ओळख झाली. यानंतर यादोघांचे लग्न करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला होता.

घरच्यांनी मुलगी पसंत केल्यानंतर तरुणानेही विरोध दर्शवला नाही. काही दिवसांनी यांचा साखरपूडा करण्यात आला. मुलीशी ओळख झाल्यानंतर सुरुवातीला या तरुणाने तिचे फोटो व्हॉट्सअॅपवरुन मागितले होते. मुलीनेही विरोध न करता आपले खाजगी फोटो त्याला पाठवले होते. काही दिवसांनी या महिलेल्या अनोळखी नंबरवरुन फोन येत होते. याफोनव्दारे मुले तिला डेटिंगसाठी विचारत होते. तेव्हा तिचा नंबर पॉर्नसाईटवर प्रसिद्ध झाल्याचे तिला समजले. तिने या तरुणाला पाठवलेले फोटोच यासाईटवर प्रसिद्ध करण्यात आले. महिलेनी तरुणाला यासंबधी विचारणा करण्यासाठी फोन केला असता त्याने उचलला नाही. तसेच तिला भेटण्यासाठीही नकार दिला. फेक अकाऊंट बंद करण्याची मागणी यावेळी महिलेनी केली. मात्र तरीही तिचे अकाऊंट पॉर्न साईटवरुन बंद करण्यात आले नाही. यानंतर मुलीने पोलिसांकडे याची तक्रार केली.

या अभियंत्याला मुलीशी लग्न करायचे नव्हते. त्याला फक्त तिच्या सोबत डेटिंग करायची होती. मात्र महिला त्याच्या विरोधात तक्रार करु नये म्हणून त्याने तिच्याशी संबध टाळले असल्याचे दिल्ली पोलिसांनी सागंतिले.

First Published on: July 27, 2018 7:56 PM
Exit mobile version