Video : तिहार तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट घेणारे सत्येंद्र जैन यांचा नवा व्हिडीओ व्हायरल

Video : तिहार तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट घेणारे सत्येंद्र जैन यांचा नवा व्हिडीओ व्हायरल

मनी लाँड्रिंग प्रकरणी तिहार तुरुंगात कैदी असलेले दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. सत्येंद्र जैन यांचा तुरुंगातील मसाजचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठ्याप्रमाणात टीकेची झोड उठवण्यात आली, हे प्रकरण थंड होत नाही तोवर नवा व्हिडीओ समोर आला आहे. भाजपकडून हा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. जो आता मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सत्येंद्र जैन जेलमध्ये मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेताना दिसतायत. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी हे सीसीटीव्ही ट्विट केलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे सत्येंद्र जैन यांच्या वकीलांना अलीकडेच त्यांना तुरुंगात नीट जेवण मिळत नसल्याचा दावा केला होता. यामुळे सत्येंद्र जैन यांचे वजनही कमी झाल्याचं त्यांच्या वकीलांनी म्हटले होते. मात्र या नव्या व्हिडीओमुळे पुन्हा सत्येंद्र जैन अडचणीत सापडले आहेत.

सत्येंद्र जैन तिहार जेलमध्ये हॉटेलचे जेवण खाताना दिसत आहेत. जैन यांच्यासमोर एक जेवणाची थाळी आहे. त्याबाजूला विविध खाद्यपदार्थ्यांनी भरलेले चार डब्बे दिसत आहेत. यावेळी त्यांच्या सेवेसाठी एक व्यक्ती सतत हजर असल्याचे व्हिडीओत दिसतेय. जेवणाची थाळी आणण्यापासून ते खुर्चीच्या शेजारी कचऱ्याचा डबा ठेवण्यापर्यंत सगळी काम तो करत आहे. अगदी सत्येंद्र जैन यांनी पाण्याची बाटली सुद्धा तो व्यक्तीचं आणून देतोय हे सीसीटीव्हीत दिसतेय.

सत्येंद्र जैन यांनी आपल्या धार्मिक विधींचे पालन करण्यासाठी साजेसं अन्न दिलं जावं अशी मागणी कोर्टात केली आहे. कोर्टाने याप्रकरणी तिहार जेल प्रशासनाला आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. यावेळी जैन यांनी आपल्याला जैन पद्धतीचं जेवण, मंदिरात जाण्याची परवानगीही दिली जात नसल्याचा दावा याचिकेत केला होता. यात भाजपने शनिवारी सत्येंद्र जैन यांना तिहार जेलमध्ये मसाज दिला जात असल्याचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर वाद उफाळून आला, जैन यांना व्हीआयपी वागणूक दिल्याप्रकरणी तिहार जेलचे अधीक्षक अजित कुमार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत 2017 मध्ये त्यांच्या विरोधात दाखल केलेल्या FIR च्या आधारे मनी लाँड्रिंग प्रकरणात सत्येंद्र जैन यांना अटक केली होती. 17 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने या प्रकरणात जैन आणि अन्य दोघांना जामीन नाकारला होता. सत्येंद्र जैन हे अजूनही दिल्ली सरकारमध्ये मंत्री आहेत, तरीही त्यांचे खाते मनीष सिसोदिया यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. सत्येंद्र जैन यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणीही भाजप करत आहे.


नायजेरियात बसच्या भीषण धडकेत 37 ठार, चार दिवसांतील तिसरा मोठा अपघात


First Published on: November 23, 2022 1:11 PM
Exit mobile version