Corona: NIA च्या मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव; कंट्रोल रुममध्ये आढळला रुग्ण

Corona: NIA च्या मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव; कंट्रोल रुममध्ये आढळला रुग्ण

एनआयए

देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा २ लाख ३६ हजारांच्या वर गेला आहे. देशातील प्रमुख राज्यांसह इतर छोट्या-मोठ्या राज्यातही कोरोनाने शिरकाव केला आहे. आता दिल्लीतील नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजंसी (एनआयए) मध्येही कोरोना रुग्ण आढळले असून त्यांच्या मुख्यालयात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एनआयए कंट्रोल रुममध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळल्याने संपूर्ण कार्यालय सॅनिटाइझ करण्यात आले आहे. तसेच संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या १० जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

हेही वाचा – CoronaVirus : भारताच्या शेजारील देशांसोबत चीन आपले संबंध वाढवतोय!

देशात कोरोनाचा गुणाकार 

देशात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. देशात शुक्रवारी ९ हजार ८८७ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २९५ रुग्णांचा मृत्यू यामुळे झाला आहे. देशात एकाच दिवशी सर्वाधिक मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी सर्वाधिक १३९ मृत्यू झाले. दिल्लीमध्ये ५८, गुजरातमध्ये ३५, तामिळनाडू, उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी १२ आणि बंगालमध्ये ११ मृत्यू झाले. दरम्यान, भारताने इटलीला मागे टाकले असून कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. इटलीमध्ये २ लाख ३४ हजार ५३१ कोरोनाचे रुग्ण आहेत. भारतात कोरोना रुग्णांचा आकडा २ लाख ३६ हजार ११७ वर पोहोचला आहे. त्यात १ लाख १५ हजार ९४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १ लाख १४ हजार ०७३ लोकांना डिस्चार्ज देण्यात आले आहे.

First Published on: June 6, 2020 4:48 PM
Exit mobile version