जैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला अटक

जैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला अटक

जैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवाद्याला अटक

जैश-ए-मोहम्मदच्या कुख्यात दहशतवादी बसीर अहमदला श्रीनगरमधून अटक करण्यात आली आहे. दिल्लीच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. या दहशतवाद्याला शोधून देण्यासाठी तब्बल २ लाखांचे बक्षिस जाहीर झाले होते. तो २०१५ पासून फरार होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला त्याच्याविषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तपास करत अटक केली.

बसीरला मिळाला होता जामीन

दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि दहशतवादी यांच्यात २००७ साली चकमक झाली होती. या चकमकीच्या पार्श्वभूमीवर बसीरला अटक करण्यात आली होती. परंतु, त्यावेळी तो जामीनावर सुटला होता. नंतर हाय कोर्टाने सर्व दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, बसीर तोपर्यंत फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला त्याच्या विषयी थोडी माहिती मिळाली होती. या माहितीच्या पार्श्वभूमीवर विशेष पथकाने बसीरचा छडा लावला.


हेही वाचा – अयोध्या दहशतवादी हल्ला प्रकरण; चौघांना जन्मठेप, एकाची मुक्तता

First Published on: July 16, 2019 11:55 AM
Exit mobile version