दिल्ली प्रदूषण: देवपुजेदरम्यान अगरबत्ती, धूप न जाळण्याचा सल्ला

दिल्ली प्रदूषण: देवपुजेदरम्यान अगरबत्ती, धूप न जाळण्याचा सल्ला

संग्रहित फोटो

राजधानी दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत चालली आहे. त्यामुळे दिल्लीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मंगळवारी दिल्लीतील हवेची गुणवत्ता अधिकच गंभीर स्तरावर असल्याचे समोर आले. त्यामुळे वाढत्या प्रदूषणाला लक्षात घेता दिल्लीकरांना यापुढे देवपुजेसाठी अगरबत्ती, धूप आणि मेणबत्ती जाळू नये असा सल्ला देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या ‘सिस्टम आफ एयर क्वालिटी फोरकास्टिंग एंड रिसर्च’ (एसएएफएआर) या संस्थेकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे.

या गोष्टींकडे लक्ष द्या?

दिल्लीकरांनी वाढत्या प्रदूषणामुळे थोडी काळजी घेण्यास सांगणयात आले आहे. गरज नसल्यास घराबाहेरही पडू नये, जर घरातील खोल्यांना खिडक्या असतील तर त्या बंद करा, एअर कंडिशनर ताजी हवी देत असेल तर तो पर्याय निवडा, लाकूड, मेणबत्ती तसंच अगरबत्तीसारख्या वस्तू जाळणे टाळा, धुळीच्या मास्कवर अवलंबून न राहता अधिक सुरक्षिततेसाठी एन-९५ किंवा पी-१००सारख्या मास्कचा वापर करा, घरातील फरशी वारंवार ओल्या कपड्याने पुसा, असा सल्ला देण्यात आला आहे.

पराली जाळल्यामुळे वाढले प्रदूषण

गेल्या काही दिवसापासून दिल्लीमधील प्रदूषण वाढत चालले आहे. त्यामुळे दिल्लीतील हवा विषारी झाली आहे. ही परिस्थिती दिवाळी आधी आहे. एसएएफएआरने हवेचा गुणवत्ता घसरल्यामुळे गेल्या २४ तासामध्ये मोठ्याप्रमाणात पराली जाळल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. या विषारी हवेचा सामान फक्त दिल्लीलाच नाही करावा लागत तर आसपासच्या शहरांना देखील याचा समाना करावा लागत आहे.

हवेची गुणवत्ता अधिक घसरली

चांगल्या आरोग्यासाठी हवेची गुणवत्ता १०० पेक्षा कमी असणे गरजेचे असते. मात्र गाजियाबाद मध्ये हवेची गुणवत्ता AQ ४३० वर म्हणजे अधिक धोकादायक असल्याचे समोर आले आहे. नोएडामध्ये AQ ३७४, ग्रेटर नोएडा AQ ३८५, गुरुग्राम AQ ३८९ पर्यंत हवेची गुणवत्ता पोहचली आहे. ही परिस्थिती फक्त दिल्ली एनसीआरमध्येच पहायला मिळत नाही तर कानपुरमधअये AQ ४२२ पर्यंत हवेची गुणवत्ता घसरली आहे.

First Published on: October 31, 2018 12:38 PM
Exit mobile version