अवघ्या २ तासांचा ऑक्सिजन शिल्लक… हतबल डॉक्टरच्या अश्रूंचा बांध फुटला

अवघ्या २ तासांचा ऑक्सिजन शिल्लक… हतबल डॉक्टरच्या अश्रूंचा बांध फुटला

आमच्याकडे आता रूग्णांना पुरवण्यासाठी ऑक्सिजनच उरलेला नाही. अवघ्या २ तासांचा ऑक्सिजन शिल्लक आहे. जो काही ऑक्सिजन आम्ही पुरवून वापरतोय तो ऑक्सिजन हा आयसीयूमध्ये असणाऱ्या रूग्णांसाठी प्राधान्याने वापरला जात आहे. आम्ही डॉक्टर आणि हॉस्पिटल म्हणून रूग्णांचा जीव वाचवण्यासाठी आहोत. पण आम्हाला हॉस्पिटलमध्ये रुग्णांला ऑक्सिजन देताच आला नाही तर आमच्या या यंत्रणेचा काय उपयोग आहे ? आमच्याकडे ऑक्सिजनच उरलेला नाही. जो काही ऑक्सिजन उरला आहे, त्याचा पुरेपूर वापर करत आम्ही आयसीयूमध्ये असणारे रूग्ण वाचवत आहोत. जर रूग्णांना ऑक्सिजनच देता आला नाही तर रूग्णांचा मृत्यूच अटळ आहे असे सांगताना दिल्लीतील शांती मुकुंद हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल सग्गर यांना अक्षरशः रडू कोसळले. हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा देताना रूग्णांना ऑक्सिजन देता येत नसल्याची हतबलता त्यांच्या बोलण्यातून जाणवली. आम्ही रूग्णांचे जीव वाचवू शकणार नसू तर डॉक्टर आणि हॉस्पिटल म्हणून आम्ही हतबल आहोत असेही म्हणाले. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दिल्लीत कोरोनामुळे निर्माण झालेली वाईट परिस्थिती सांगताना डॉक्टरांच्या अश्रूचा बांध फुटला.

आमच्याकडे आता शेवटचचे २ तास पुरेल इतका ऑक्सिजन उरला आहे. ज्या रूग्णांना घरी पाठवता येईल, अशा रूग्णांना डिस्चार्ज देऊन टाका अशा सूचना आम्ही दिल्या आहेत. जे ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध आहेत, ते सिलेंडर आम्ही आयसीयूच्या रूग्णांसाठी वापरत आहोत. कारण या रूग्णांसाठी ऑक्सिजन गरजेचा असून त्या रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा झाला नाही तर काहीही घडू शकते. आमच्या हॉस्पिटलमध्ये जवळपास १०० रूग्ण आहेत. त्यापैकी काही रुग्ण हे कर्करोग आणि ह्दयविकाराच्या आजाराने त्रस्त आहेत. तर रुग्ण हे १२ वेंटीलेटरवर आहेत. पण ही सगळी परिस्थिती अतिशय हतबल करणारी आहे. आम्ही जर रूग्णांचा जीव वाचवू शकत नसू तर आमच्या यंत्रणेचा काय उपयोग असे सांगताना सीईओंचे डोळे पाणावले.

दिल्लीतल्या अनेक हॉस्पिटलच्या निमित्ताने हायकोर्टालाही ऑक्सिजनच्या तुटवड्याची दखल घ्यावी लागली आहे. रातोरात सुनावणी घेत दिल्लीतल्या मॅक्स हॉस्पिटलला ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानेही या संपुर्ण प्रकरणाची दखल घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून देशातील ही परिस्थिती पाहता सुमोटो सुनावणी शुक्रवारी घेण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. तर टाटा ग्रुप्सचे रतन टाटा यांनीही दिल्लीतील ऑक्सिजनचा तुटवडा पाहता दिल्लीला ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.


 

First Published on: April 22, 2021 3:29 PM
Exit mobile version