omicron-डेल्टा आणि ओमीक्रॉन नंतर आता ‘डेल्मिक्रॉन’चं संकट

जगभरात कोरोनाचा नवीन वेरियंट ओमीक्रॉनने धूमाकूळ घातला असून अमेरिका आणि युरोपमध्ये ओमीक्रॉनचा स्फोट झाला आहे. यामुळे संपूर्ण जगाला या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. याचदरम्यान, ओमीक्रॉनचे थैमान सुरू असलेल्या या देशांमध्ये आता नागरिकांना ‘डेल्मिक्रॉन’ व्हायरसची लागण होत असल्याचे समोर आल्याने वैज्ञानिकांची झोप उडाली आहे.

दरम्यान, लसीकरणाचा वेग पाहता युरोपिय देशांच्या तुलनेत भारतात डेल्मिक्रॉनचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होऊ शकतो असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. एका इंग्रजी वृतपत्राने याबदद्ल माहिती दिली असून महाराष्ट्राच्या कोव्हिड १९ टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी यांनीदेखील अमेरिकेत आणि युरोपमध्ये डेल्मिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे म्हटले आहे.

डेल्मिक्रॉन आहे तरी काय?

गेल्या काही दिवसात अमेरिका आणि युरोपमध्ये ओमीक्रॉनबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अचानक वाढलेल्या या रुग्णवाढीमुळे येथील आरोग्य यंत्रणाही धास्तावल्या आहेत. यादरम्यान, अनेक रुग्णांना एकाच वेळी डेल्टा आणि ओमीक्रॉनची लागण झाल्याचे तपासणीत निदर्शनास आले. कोरोना व्हायरसचे हे दोन वेरिंयट एकत्र येऊन डेल्मिक्रॉन वेरियंटची उप्तति झाली आहे.

डेल्मिक्रॉनचा संसर्ग कसा होतो

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार डेल्मिक्रॉनचा संसर्ग तेव्हा होतो जेव्हा व्यक्तीला डेल्टाबरोबरच ओमीक्रॉनची लागण होते. तसेच डेल्टाच्या संसर्गातून बरे झालेल्या व्यक्तीला जर ओमीक्रॉनची बाधा झाली तर त्यालाही डेल्मिक्रॉनचा संसर्ग होतो. वैज्ञानिकांच्या मते डेल्मिक्रॉनचा संसर्ग ही दुर्मिळ घटना आहे. पण गर्दीच्या ठिकाणी डेल्मिक्रॉनची लागण सहज होऊ शकते. तसेच डेल्मिक्रॉनचा संसर्ग हा डेल्टाच्या तुलनेत सामान्य असल्याने डेल्मिक्रॉन रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासत नाही तसेच डेल्मिक्रॉनची लागण झाल्याने अद्याप एकही मृत्यू झाल्याची नोंद जगभरात नाही. मात्र ज्या व्यक्तींना सहव्याधी असतील, ज्याची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल त्यांनी  सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

 

First Published on: December 24, 2021 4:11 PM
Exit mobile version