Delta Plus Variant: डेल्टा प्लस व्हेरियंटची नेमकी लक्षणे काय? कसा कराल बचाव?

Delta Plus Variant: डेल्टा प्लस व्हेरियंटची नेमकी लक्षणे काय? कसा कराल बचाव?

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता पुन्हा एकदा कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. या व्हेरियंटमुळे देशातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वेगाने वाढत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीतून वाचण्यासाठी कोरोना प्रोटोकॉलसह डेल्टा प्लस व्हेरियंटची माहिती करुन घेणे अधिक गरजेचे आहे. तर मग जाणून घेऊया डेल्टा व्हेरियंट नेमका आहे? त्याची लक्षणे कशी आहेत? आणि या व्हेरियंटपासून कसा कराल बचाव?

‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ म्हणजे काय?

कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरियंट ज्याला B.617.2 असे म्हटले जाते. या व्हेरियंटच्या म्यूटेंट होऊन त्याचे डेल्टा प्लस किंवा AY.1 मध्ये रुपांतरण झाले. हा व्हेरियंट केवळ भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये आढळून आल्याने आरोग्य तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. डेल्टा व्हेरियंटच्या स्पाइकमध्ये K417N म्यूटेशन जोडल्याने डेल्टा प्लस व्हेरियंट तयार झाला आहे. K417N व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या बीटा व्हेरियंट आणि ब्राझीलमध्ये सापडलेल्या गॅमा व्हेरियंटमध्येही आढळला आहे. सध्या जीनोम सीक्केंसिंगचे शास्त्रज्ञ या व्हेरियंटवर नजर ठेवून असून अधिक माहिती लवकरचं उपलब्ध करणार आहेत.

याशिवाय दक्षिण आफ्रिकेतील बीटा व्हेरियंटमध्ये K417N व्हेरियंटची काही लक्षणे आढळतात. यामुळे हा व्हेरियंट अधिक धोकादाकय असल्याचे सांगितले जात आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात डेल्टा प्लस व्हेरियंटचे ४० रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, जम्मू आणि कर्नाटकमध्ये 40 रुग्ण आढळले आहेत.यात WHOने डेल्टा व्हेरियंटला ‘चिंताजनक व्हायरस’ असे संबोधले आहे.

‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटची लक्षणे

आरोग्य मंत्रालयाच्या मते, डेल्टा प्लस अधिक संसर्गजन्य आहे आणि हा विषाणू फुफ्फुसांच्या पेशींच्या रिसेप्टरला अधिक घट्टपणे चिपकुन राहण्यास सक्षम आहे. ज्यामुळे फुफ्फुसांना लवकर प्रभाव होण्याची शक्यता आहे. हा व्हेरियंट आपल्या प्रतिकारशक्तीस चकावा देण्यासही अधिक सक्षम आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटचा संसर्ग झालेल्यांना तीव्र खोकला, सर्दी होत आहे. पण सर्दीची लक्षणे मागील विषाणूपेक्षा अगदी वेगळी असल्याचे आढळली आहेत. अभ्यासानुसार, डोकेदुखी, घसा खवखवणे आणि सतत नाक वाहणे ही डेल्टा प्लस व्हेरियंटची सर्वसामान्य लक्षणे आहेत.

‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटपासून कसा कराल बचाव?

कोरोना विषाणूच्या पूर्वीच्या सर्व व्हेरियंटप्रमाणेच, आपल्याला डेल्टा प्लस व्हेरियंटबाबतही आवश्यकती खबरदारी घ्यावी लागेल.

१)गरज असल्यासच घराबाहेर पडा.

२) घराबाहेर पडण्यापूर्वी मास्क लावा, विशेषत: डबल मास्क वापरा.

३) दिवसातून अनेक वेळा २० सेकंद तरी हात धुवा.

४) लोकांपासून ६ फूट शारीरिक अंतर अंतर ठेवा.

५) घरात आणि आपला परिसरात स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण ठेवा.

६) बाहेरून आणलेल्या प्रत्येक वस्तूचे निर्जंतुकीकरण करा.


CBSE Board 2021: बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करा, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश

First Published on: June 24, 2021 5:02 PM
Exit mobile version