‘या’ आजारामुळे केली केट स्पेडनं आत्महत्या !

‘या’ आजारामुळे केली केट स्पेडनं आत्महत्या !

फॅशन डिजायनर केट स्पेड

अमेरिकेतील सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर केट स्पेडनं काल आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. या बातमीने अमेरिकेच्या फॅशन जगतात एकच खळबळ माजली. न्यूयॉर्क पोलिसांनी आत्महत्येच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. केटची बहीण रेटा सैफो हिच्या म्हणण्यानुसार, केट काही काळापासून मानसिक त्रासातून जात होती. तिला बायपोलर डिसऑर्डर हा आजार होता. तिनं यावर डॉक्टरांचा सल्ला घेण्यात निष्काळजीपणा केला.

पती अॅन्डीसोबत केट स्पेड

का केली केटनं आत्महत्या?
केटनं आत्महत्येपूर्वी आपल्या १३ वर्षीय मुलीसाठी एक सुसाईड नोट लिहिली आहे. आपल्या मृत्यूसाठी स्वत:ला जबाबदार न मानता याचं कारण आपल्या वडिलांना (केटच्या पतीला) विचारण्यात यावे असे तिनं आपल्या मुलीला या पत्रातून म्हटलं आहे. ही नोट न्यूयॉर्क पोलिसांच्या हाती लागली आहे.

पत्रकार ते फॅशन डिजायनर केट स्पेड

पत्रकार ते फॅशन डिझायनर ‘केट’
५५ वर्षीय केट स्पेडनं आपल्या करिअरची सुरुवात एक पत्रकार म्हणून केली होती. ८० च्या दशकात मॅनहॅटनमध्ये महिलांवर आधारित मॅगझिन ‘Mademoiselle’ मध्येही तिनं काम केलं होतं. त्यानंतर १९९३ मध्ये तिनं पती अॅन्डीसोबत ‘एपानमस’ फॅशन ब्रॅण्डची सुरुवात केली. केटनं हॅन्डबॅग व्यवसायातही आपला दबदबा निर्माण केला होता. अॅन्डी आणि केटनं १९९४ मध्ये विवाह केला होता. त्यानंतर त्यांनी कपडे आणि ज्वेलरीमध्येही आपला व्यावसाय वाढवला होता.

बायपोलर डिसऑर्डर

बायपोलर डिसऑर्डर म्हणजे काय?
बायपोलर डिसऑर्डरला (व्दिध्रुवीय मनोविका‌र) मॅनिक डिप्रेशन असंही म्हटलं जातं. या आजारामुळे मेंदुमध्ये अचानक बदल होतात. या आजाराने ग्रासलेला व्यक्ती कधी खूपच आनंदी असते तर कधी दुःधी होते. कधी ती रागात असते तर कधी उदास असते.

बायपोलर डिसऑर्डरची लक्षणं

First Published on: June 6, 2018 12:57 PM
Exit mobile version