Dhami Cabinet 2.0 : सीएम पुष्कर सिंह धामी यांच्यासह ‘या’ 8 मंत्र्यांनी घेतली शपथ; पाहा मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी

Dhami Cabinet 2.0  : सीएम पुष्कर सिंह धामी यांच्यासह ‘या’ 8 मंत्र्यांनी घेतली शपथ; पाहा मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी

Dhami Cabinet 2.0 : सीएम पुष्कर सिंह धामी यांच्यासह या 8 मंत्र्यांनी घेतली शपथ; पहा मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी

उत्तराखंडला (Uttarakhand) आज 12वे मुख्यमंत्री म्हणून आज पुष्कर सिंह धामी यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी यांच्या मंत्रिमंडळाबाबत सुरु असलेल्या सस्पेन्सवर अखेर पडदा पडला आहे. धामी यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण मंत्री असणार याची नावे उघड झाली असून रितू खंड्डुरी यांना विधानसभेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. खंड्डुरी या उत्तराखंड विधानसभेच्या अध्यक्षा होणार्‍या पहिल्या महिला आहेत. यापूर्वी भाजप सरकारमध्ये मंत्री असलेले सतपाल महाराज आणि धनसिंह रावत हेही शपथ घेत आहेत. धामी यांच्यासह त्यांचे 8 मंत्रीही आज शपथ घेत आहेत. यामध्ये सतपाल महाराज, प्रेमचंद अग्रवाल, गणेश जोशी, धनसिंग रावत, सुबोध उनियाल, रेखा आर्य, चंदन रामदास आणि सौरभ बहुगुणा यांनी शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक व्हीआयपी मंडळी उपस्थित होते.

धामी कॅबिनेट 2.0 मध्ये ज्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आलाय त्यात सतपाल महाराज आणि धनसिंग रावत यांसारख्या अनुभवी दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय बागेश्वरमधून सलग चार वेळा आमदार झालेले चंदन राम दास हे देखील शपथविधी सोहळ्यात हजर आहेत. मात्र मंत्रिमंडळात कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान धामी आपल्या नव्या टीममध्ये तरूण आणि अनुभवी यांच्या समतोल निर्माण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. धामी मंत्रिमंडळात शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची नावे…

सतपाल महाराज, चौबत्ताखलचे आमदार

प्रेमचंद अग्रवाल, ऋषिकेशचे आमदार

गणेश जोशी, मसुरीचे आमदार

धनसिंग रावत, श्रीनगरचे आमदार

सुबोध उनियाल, नरेंद्रनगरच्या आमदार

रेखा आर्य, सोमेश्वरचे आमदार

चंदन राम दास, बागेश्वरचे आमदार

सौरभ बहुगुणा, सितारगावचे आमदार

कोणत्या आमदारांची नावं ठरतायत खास?

अनुभवी नेत्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे आमदार बिशनसिंग चुफळ यांनी म्हटले आहे. चुफळ यांचा मागील मंत्रिमंडळात समावेश होता, मात्र यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याची कोणतीही माहिती नाही. याशिवाय माजी शिक्षणमंत्री अरविंद पांडे यांच्या नावाचीही चर्चा होती, मात्र शपथ घेणाऱ्यांमध्ये त्यांचे नाव निश्चित झालेले नाही. त्याचवेळी किच्छाचे माजी आमदार राजेश शुक्ला म्हणाले, नवीन मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना स्थान द्यावे.

उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीत (Uttarakhand Assembly elections) भाजपने 70 पैकी 47 जागा जिंकल्या. त्यामुळे भाजप आता पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करत आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 19, बहुजन समाज पक्ष आणि अपक्षांना प्रत्येकी 2 जागा मिळाल्या आहेत.


 

First Published on: March 23, 2022 3:47 PM
Exit mobile version