Viral Video: इमरजन्सी लँडिंग करताना विमानाचे झाले दोन तुकडे!

Viral Video: इमरजन्सी लँडिंग करताना विमानाचे झाले दोन तुकडे!

Viral Video: इमरजन्सी लँडिंग करताना विमानाचे झाले दोन तुकडे!

सोशल मीडियावर नेहमीच आश्चर्यचकीत करणारे आणि भीतीदायक व्हिडिओ खूप व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पाहून युझरच्या हृदयाचा ठोकाच चुकतो. दरम्यान आपण विमान कोसळल्याचे आणि विमानतळावरील इमरजन्सी लँडिंगचे बरेच व्हिडिओ पाहिले आहेत. आता असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मालवाहू विमानाचे (कार्गो एअरक्राफ्ट) इमरजन्सी लँडिंग करताना कशाप्रकारे दोन तुकडे होतात हे दिसत आहे.

या विमानाची लँडिंग इतकी भयानक आहे की, व्हिडिओ पाहणाऱ्या युझर्सला आश्चर्याचा धक्काच बसले. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये डीएचएल कंपनीचे विमान इमरजन्सी लँडिंग दरम्यान विमातळावरील धावपट्टीवरून घसरते आणि त्याचे दोन तुकडे होतात.

हा व्हिडिओ जुआन सॅनटामारिया आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आहे, जिथे डीएचएलचे बोईंग 757-200 मालवाहू विमान इमरजन्सी लँडिंग करताना अपघातग्रस्त झाले. माहितीनुसार डीएचएलचे बोईंग गाँटमाल जात होते, परंतु हायड्रॉलिक्स सिस्टममध्ये काही बिघाड झाल्यामुळे त्याला इमरजन्सी लँडिंग करावे लागले. अशाप्रकारे तुटून त्या विमानाचे दोन भाग होणे, ही सामान्य गोष्ट नाही. दिलासादायक बाब म्हणजे या विमान दुर्घटनेदरम्यान कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. डीएचएलने या दुर्घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत.


हेही वाचा – ‘या’ फोटोत किती प्राणी आहेत?, पटापट शोधा, 99 टक्के लोकांनी मानली हार


 

First Published on: April 10, 2022 2:56 PM
Exit mobile version