Mucormycosisपासून सुरक्षित राहण्यासाठी डायबिटीसच्या रुग्णांनी ब्लड शुगर लेवल नियंत्रणात ठेवा – AIIMS च्या प्रमुखांचा सल्ला

Mucormycosisपासून सुरक्षित राहण्यासाठी डायबिटीसच्या रुग्णांनी ब्लड शुगर लेवल नियंत्रणात ठेवा – AIIMS च्या प्रमुखांचा सल्ला

Mucormycosisपासून सुरक्षित राहण्यासाठी डायबिटीसच्या रुग्णांनी ब्लड शुगर लेवल नियंत्रणात ठेवा - AIIMS च्या प्रमुखांचा सल्ला

कोरोना नंतर म्युकोरमायकोसिस (Mucormycosis) या आजाराने डोके वर काढले आहे. कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर म्युकोरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार होत आहे. या आजारामुळे अनेकांचा जीव देखिल गेला आहे. केंद्राने देखिल म्युकोरमायकोसिस या आजाराचा साथीच्या आजारात समावेश केला आहे. म्युकोरमायकोसिस हा आजार डायबिटीज असलेल्या रुग्णांना त्याचप्रमाणे कोरोना उपचारांवेळी जास्त प्रमाणात स्टेरॉइडचा वापर केला असलेल्या रुग्णांमध्ये त्याचा जास्त संसर्ग होत आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितल्यानुसार, या आधीही म्युकरसायकोसिस हा बुरशीजन्य आजार होता. डायबिटीस मेलिटस म्हणजे रक्तात साखरेची पातळी जास्त असणाऱ्या रुग्णांमध्ये हा आजार आढळून येत होता. त्याचप्रमाणे कँन्सर रुग्ण अवयवरोपण झालेल्या व्यक्ती आणि इम्युनोसप्रेसंट्स (प्रतिकारशक्तीला दुर्बल करणारी औषधे) घेणाऱ्या व्यक्तींनाही हा रोग होत होता.  कोरोनाच्या काळात मात्र या आजारात वाढ झाली आहे. शक्यतो डायबिटीज असणाऱ्या रुग्णांनी आपली ब्लड शुगर लेवल नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचा सल्ला डॉ. गुलेरिया यांनी दिला आहे. (Diabetes Patients Control Blood Sugar Levels To Protect Against Mucormycosis – Advice AIIMS Head)

हाय डाबेटिस, स्टेरॉइडचा जास्त वापर करणाऱ्या आणि कोरोना पॉझिव्ह हे ही तिन्ही लक्षणे एकत्र आढळली तर रुग्णाला म्युकरमायकोसिसचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे हाय डायबिटीस असणाऱ्या रुग्णांनी त्यांची ब्लड शुगर लेवल सातत्याने तपासणे आणि ती नियंत्रित ठेवली पाहिजे असे डॉ. गुलेरिया  यांनी सांगितले.

डॉ. गुलेरिया यांनी पुढे असेही सांगितले आहे की, कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांनी स्टेरॉइड घेणे टाळले पाहिजे. सौम्य लक्षणे असणाऱ्यांना स्टेरॉइडचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे म्युकोरमायकोसिसचा धोका वाढण्याची शक्यता आहे. स्टेरॉइड घेणाऱ्यांनी त्यांच्या शरीरातील ब्लड शुगर लेवल सातत्याने तपासणे गरजेचे आहे. स्टेरॉइड घेतल्याने बऱ्याचदा डायबेटिसणाऱ्या रुग्णांची ब्लड शुगर लेवल वाढून ३०० ते ४०० पर्यंत पोहचू शकते. स्टेरॉइड केवळ ५ ते १० दिवसांसाठी दिले पाहिजे असे आकडेवारीतून सांगितले गेले आहे. कारण स्टेरॉइड आपल्या शरीरातील ब्लड शुगर लेवल वाढवते. पुढे वाढलेली शुगर लेवल नियंत्रणात आणणे कठीण होते त्यामुळे म्युकोरमाकोसिसचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण होतो.


हेही वाचा – मायलॅबचे १ कोटी CoviSelf कोरोना चाचणी किट निर्मितीचे उद्दिष्ट

स न

 

 

First Published on: May 21, 2021 4:12 PM
Exit mobile version