ऐकावं ते नवलंच, हिऱ्यांच्या शोधात गावकऱ्यांनी खोदलं अख्ख गावं

दक्षिण आफ्रीकेतील क्वाज़ुलु-नताल प्रांतांतील क्वाहथी या गावात सध्या विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. एका शेतकऱ्याला शेतात हिरा सापडला. यामुळे गावातील जमिनीत हिरे सापडत असल्याचा समज झाल्याने गावकऱ्यांनी संपूर्ण गावच खोदायला घेतलंय. विशेष म्हणजे हिऱ्याच्या हव्यासापोटी अनेकांनी शेत खणून स्वत;च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.

लोभ माणसाला किती आंधळ बनवतो याच उत्तम उदाहरण क्वाहथी गावात सध्या बघायला मिळतयं. गावात बाराही महिने दारिद्र्य असून शेती हाच गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय आहे. पण येथील हवामान बेभरवशाचे असल्याने शेतीही अनियमित आहे. यामुळे येथील गावकऱ्यांना कामासाठी बाहेर जावे लागते. याच दरम्यान, एका शेतकऱ्याला शेतात खोदकाम करताना एक दगड सापडला. क्वार्ट्ज क्रिस्टल असं त्याचे नाव असून तो अमूल्य असल्याचे एकाने सांगितले. तसेच याच दगडाला पैलू मारून हिरे तयार होतात. असे एका गावकऱ्याने शेतकऱ्याला सांगितले. यामुळे गावात एकच खळबळ उडाली.

हा अमूल्य दगड बघण्यासाठी गावकऱ्यांनी शेतात तुफान गर्दी केली. त्यानंतर मात्र जो तो कुदळ आणि फावडे घेऊन मोकळी जमीन खोदत आहे. काहींनी तर शेतच खोदायला सुरूवात केली असून हजारो हेक्टर शेती खणल्याने स्वत:चे नुकसानही करून घेतले आहे. दरम्यान, गावात हिरा सापडल्याचे कळताच दक्षिण अफ्रीका सरकार सक्रीय झाली आहे. त्यानंतर उत्खन्नन विभागाने भूवैज्ञानिकांची एक स्पेशल टीम गावात पाठवली आहे.

 

First Published on: June 17, 2021 5:40 PM
Exit mobile version