आपला मृत्यू देखील झाला ‘मेड इन चायना’

आपला मृत्यू देखील झाला ‘मेड इन चायना’

करोना व्हायरस

करोना व्हायरस सध्या अनेक देशात थैमान घालत आहे. करोना व्हायरसची लागण ही चीनमधून अनेक देशांमध्ये पसरली होती. या मुद्यावरूनच बॉलिवूडचे नावाजलेले दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्विट केल आहे. हे ट्विट सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. करोना व्हायरसने भारतात देखील आता आपली मान डोकावली आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

नेमके काय म्हणाले राम गोपाल वर्मा

‘सरकार’ आणि ‘सत्या’ सारख्या गाजलेल्या सिनेमाचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी करोना व्हायरसवर एक ट्विट केल आहे. सध्या करोना व्हायरसने अनेक देशांत मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पडतायत, त्यामुळे आता ‘आपला मृत्यू देखील मेड इन चायना झाला आहे’, असे ट्विट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केले आहे. ‘मी कधी विचार देखील केला नव्हता की, आपला मृत्यू देखील मेड इन चायना असेल’, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

भारतातील करोनाचा आकडा ‘सहा’वर

अनेक देशात करोनाने दहशत पसरवली असताना आता भारतात देखील करोनाची लागण झाल्याचे दिसत आहे. भारतात करोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत वाढ होऊन याचा आकडा आता सहावर पोहचला आहे. मंगळवारी जयपूर येथे इटलीहून आलेल्या एका पर्यटकाला करोनाची लागण झाल्याने याचा रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे.


हेही वाचा- करोनामुळे चार देशांचे व्हिजा निलंबित


 

First Published on: March 4, 2020 9:12 AM
Exit mobile version