कंपनी परिसरात नमाज पठणाला बंदी – पोलीस

कंपनी परिसरात नमाज पठणाला बंदी – पोलीस

फोटो सौजन्य - Latestly.com

नोएडा पोलिसांनी घेतलेल्या निर्णयावरून आता वाद निर्माण झाला आहे. कंपनी परिसरामध्ये नमाज पठण किंवा कोणत्यााही धार्मिक गोष्टी करता येणार नाहीत, असा आदेश नोएडा पोलिसांनी काढला आहे. सेक्टर – ५८ मधील कंपनीतील कर्मचारी दर शुक्रवारी कंपनी परिसरामध्ये नमाज पठण करतात. पण, यापुढे नमाज पठण करता येणार नाही. शिवाय, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तसा प्रयत्न केल्यास त्यासाठी कंपनी जबाबदार असेल. असं देखील पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, याबाबत कंपनी व्यवस्थापनानं पोलिसांशी मीटिंग देखील केली आहे. पण, त्यानंतर देखील कोणताही तोडगा न निघाल्यानं या आदेशाविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनानं घेतला आहे. तर, कोणत्याही समाजाच्या भावना दुखवण्याचा आणि कोणत्याही धार्मिक प्रथेला आमचा विरोध नाही. अशा शब्दात पोलिसांनी आपली बाजू मांडली आहे. एनडी टीव्हीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

कुणी तक्रार केली का? 

दरम्यान, काही हिंदु गटांनी नमाजामुळे अडथळा निर्माण होतो अशी तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर सेक्टर ५८ मधील पोलिसांनी १२ मल्टी नॅशनल कंपन्यांना याबाबत नोटीस पाठवत कंपनी परिसरामध्ये नमाज पठण करता येणार नाही असं सांगितलं आहे. शिवाय, यानंतर देखील कुणी नमाज पठण केल्यास त्यासाठी कंपनी जबाबदार असेल असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे. यावर बोलताना पोलिसांनी आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यानंतर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये नमाज पठण करण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी कंपन्यांनी धाव देखील घेतली. पण, त्याठिकाणी देखील त्यांच्या पदरी निराशाच आली.

वाचा – ताजमहालमध्ये नमाज पठणाला बंदी

आम्ही मागील पाच वर्षापासून याठिकाणी नमाज अदा करत आलो आहोत असं येथील काही मुस्लिमांनी सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी काहींना आदेशाचं उल्लंघन केल्यानं ताब्यात घेतल्याची माहिती आता समोर येत आहे. यावर बोलताना हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी देखील मोकळ्या जागेत नमाज अदा करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. पण, कुणाला थांबवता देखील येत नाही अशी पुष्टी देखील त्यांनी जोडली आहे.

वाचा – आयफोन हवा तर नमाज पठण कर

First Published on: December 25, 2018 6:47 PM
Exit mobile version