भूपेश बघेल यांच्याबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत?

भूपेश बघेल यांच्याबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत?

असीम दास याने 'बघेल' यांच्या नावाने राजकारण्यांना मोठी रक्कम देण्याची व्यवस्था केल्याचे उघड झाले आहे

छत्तीसडमध्ये भाजपची असलेली १५ वर्षाची सत्ता काँग्रेसनं खेचून आणली. त्यानंतर भाजपची जादू ओसरू लागली आहे का? लोकांना भाजपच्या सत्तेचा कंटाळा आला आहे का? असे एक ना प्रश्न विचारले जाऊ लागले. काँग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकताच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर कौतुकांचा वर्षाव झाला. पण, महत्त्वाची बाब म्हणजे या निवडणुकीमध्ये असे चेहरे समोर आणले ज्यांनी काँग्रेसच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यातील छत्तीसगडमधीस चेहरा म्हणजे भूरेश बघेल. भूपेश बघेल यांनी काँग्रेसच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत भाजपला धुळ चारली. भूपेश बघेल यांनी छत्तीसगड राज्य चाळत भाजपच्या १५ वर्षाच्या सत्तेला सुरूंग लावला. त्यानंतर भूपेश बघेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. त्यामुळे भूपेश बघेल नेमकं आहे तरी कोण? असा सवाल तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल नाही का?

भूपेश बघेल यांच्या यांच्याबद्दलच्या या गोष्टी माहित आहेत?

१ ) काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी भूपेश बघेल यांच्या खांद्यावर होती. त्यावेळी त्यांनी राज्यभर दौरे करत भाजपविरोधात रान उठवले. भाजपच्या विजयामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे १५ वर्षे मुख्यमंत्री असलेल्या रमण सिंह यांना धक्का बसला. भूपेश बघेल यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसनं ९० पैकी ६८ जागा जिंकल्या.

२ ) भूपेश बघेल हे कुर्मी जातीतील आहेत. कुर्मींची संख्या छत्तीसगडमध्ये राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ५२ टक्के आहे. 

३ ) पाच वेळा भूपेश बघेल मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले आहेत. अजित जोगी यांच्या सरकारमध्ये भूपेश बघेल मंत्री म्हणून देखील होते.

४ ) १९९३ साली भूपेश बघेल पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर सामुहिक विवाह सोहळे आयोजित केल्या नंतर त्यांची चर्चा सर्वत्र झाली. 

५ ) छत्तीसगडमध्ये त्यांना तुरूंगवास देखील भोगावा लागला आहे. पण, या साऱ्या गोष्टी भूपेश बघेल यांच्या पथ्यावर पडल्या.

First Published on: December 17, 2018 10:08 AM
Exit mobile version