#MenToo : पुरूषही स्वतःवरच्या अत्याचाराचा पाढा वाचणार

#MenToo : पुरूषही स्वतःवरच्या अत्याचाराचा पाढा वाचणार

#Me Too

सध्या #MeToo चळवळ जोरात सुरू आहे. प्रत्येक क्षेत्रातील महिला आता आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल पुढे येऊन बोलत आहेत. त्यावर उलटसुलट चर्चा देखील होताना दिसत आहेत. केवळ महिलांची बाजू ऐकून पुरूषांना दोषी धरू नका असा सुर देखील ऐकू येत आहे. तर अत्याचार हे केवळ पुरूषांवरच होतात का? पुरूषांवर अत्याचार होत नाहीत का? तर थोडं थांबा. पुरूषांवर देखील अन्याय होतात. त्यांना देखील महिलांकडून होणाऱ्या अत्याचाराचा सामना करावा लागतो. पण आम्ही तर पुरूष आहोत, बोलणार कसं? या दबावापोटी पुरूष देखील अत्याचाराबद्दल बोलणं टाळतात. पण, आता पुरूषांनी काहीही घाबरण्याचं कारण नाही. कारण, त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल पुरूष देखील बोलू शकणार आहेत. त्यासाठी आता #MenToo ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. बैंगळूरूतील १५ लोकांनी पुढाकार घेत ही चळवळ आता सुरू केली आहे.

#Metoo विरूद्ध #Mentoo

सध्या #MeToo चळवळ जोरात सुरू आहे. महिला आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडत आहेत. पण #MeToo वापरून त्याचा दुरूपयोग होता कामा नये असे #MenToo कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. शिवाय पुरूषाची बाजू देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तनुश्री दत्ता – नाना पाटेकर वादानंतर अनेकांनी #MeTooच्या माध्यमातून आम्हाला देखील अत्याचाराचा सामना करावा लागल्याचं सांगितले. पण, या साऱ्या प्रकरणातील तथ्य जाणून घ्यायला हवं अशा प्रतिक्रिया देखील समोर आल्या आहेत.

कोणा- कोणावर आरोप

नाना पाटेकर, चेतन भगत, अनु मलिक,सुभाष घई, विकास बहल, आलोखनाथ, एम. जे. अकबर यांच्यावर #MeTooच्या माध्यमातून लौंगिक शोषणाचे आरोप झाले. सध्या या प्रत्येकानं आपल्यावरील आरोपांंचं स्पष्टीकरण देखील देण्याचा प्रयत्न केला. पण केवळ महिला आहेत म्हणून त्यांच्यावर विश्वास नको. पुरूषांची बाजू देखील समजून घ्यायला हवं अशा प्रतिक्रिया देखील आता समोर येत आहे. तसेच कामाच्या ठिकाणी विशाखा समिती नेमावी अशी मागणी देखील केली जात आहे. पुढील काळात या साऱ्या गोष्टी कशा वळत घेतात हे पाहावं लागणार आहे.

वाचा – #He Too बद्दल तुम्हाला माहित आहे का?

First Published on: October 22, 2018 12:09 PM
Exit mobile version