Coronavirus: पुतीन यांना भेटलेल्या डॉक्टरला कोरोनाची लागण

Coronavirus: पुतीन यांना भेटलेल्या डॉक्टरला कोरोनाची लागण

पुतीन यांना भेटलेल्या डॉक्टरला कोरोनाची लागण

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना गेल्या आठवड्यात मॉस्कोच्या रुग्णालयात डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वत: डॉक्टरानंनी दिली आहे. गेल्या आठवड्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मॉस्कोमधील कोरोना व्हायरसच्या मुख्य रुग्णालयाची पाहणी करायला दौरा केला होता. पुतीन यांनी गेल्या मंगळवारी कोम्मुनारका रुग्णालयात भेट दिली जेथे त्यांनी डेनिस प्रोटेसेन्को या डॉक्टरांशी गप्पा मारल्या. दोघांनीही त्यांच्या संभाषणादरम्यान संरक्षणात्मक उपकरणे परिधान केलेली नव्हती. डॉक्टर प्रोटेसेन्को यांनी फेसबुकवर कोरोना झाल्याची माहिती दिली. “होय, मला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. परंतु माझी प्रकृती खूप चांगली आहे. मी माझ्या कार्यालयात स्वत: ला अलग केले आहे.”


हेही वाचा – अहमदनगरमध्ये परदेशी नागरिकांना लपवून ठेवलं; मशिदीच्या विश्वस्तांवर गुन्हा दाखल


क्रेमलिनने सांगितले की पुतीन यांची कोरोनाव्हायरससाठी नियमितपणे तपासणी केली जात होती आणि “सर्व काही ठीक आहे,” अशी माहिती आरआयएच्या वृत्तसंस्थेने दिली आहे. गेल्या आठवड्यात रूग्णालयात जाताना पुतीन यांनी रुग्णालयात भेटीदरम्यान एक हज़्माट सूट आणि श्वासयंत्र परिधाण केले होते. परंतु प्रोटेसेन्कोबरोबर झालेल्या बैठकीदरम्यान कोणताही संरक्षणात्मक खबरदारी न घेता त्यांच्याशी ते हात मिळवत असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.

 

First Published on: April 1, 2020 10:04 AM
Exit mobile version