Doctor’s prescription : टिंगलटवाळीचा विषय ठरणारी ‘डॉक्टर लिपी’ बनली चर्चेचा विषय

Doctor’s prescription : टिंगलटवाळीचा विषय ठरणारी ‘डॉक्टर लिपी’ बनली चर्चेचा विषय

मुंबई : डॉक्टरांनी एखादे औषध लिहून (Doctor’s prescription) दिले की, ते नेमके कोणते औषध आहे हे फार्मसीवालाच (pharmacy) ओळखू शकतो, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. त्यामुळे एखाद्याचे लिखाण अगम्य प्रकारात मोडणारे असेल तर, त्याला सर्रास ‘डॉक्टर लिपी’ म्हटले जाते. अशाच एका ‘डॉक्टर लिपी’ची (Doctor handwriting) सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. केरळमधील एका डॉक्टरचे हे प्रीस्क्रिप्शन आहे.

दुधात पाणी मिसळून अनेकांनी माया जमा केली, आता कोणतेही भेसळ नसलेले दूध कुणी विकले तर, त्यांचे इमले उभे राहतील, अशा आशयाचे वाक्य प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांचे आहे. तसेच काहीसे डॉक्टर लिपीबद्दल आहे. औषध दुकानांतील विक्रेत्यांना डॉक्टरांच्या हस्तलिखितांची सवय झालेली असते. कितीही अगम्य प्रीस्क्रिप्शन घेऊन गेलात तरी ते आपल्याला योग्य ती औषधे देतात. अर्थातच, त्यांना दुकानातील बहुतांश औषधांची नावे माहीत असतात; शिवाय परिसरातील डॉक्टरांचे हॅण्डरायटिंग परिचयाचे असते. त्यामुळे त्यांना नेमकेपणाने औषधे देणे अवघड जात नाही.

सर्वसामान्यांच्या दृष्टीने मात्र प्रीस्क्रिप्शनवर डॉक्टरांनी ‘खरडलेली’ औषधांची नावे, समजणे अवघडच असते. त्यामुळे एखाद्याचे लिखाण अगम्य असेल तर, त्याला थेट याच ‘डॉक्टर लिपी’ची उपमा देत, त्याची थट्टामस्करी केली जाते. पण सध्या सोशल मीडियावर एक प्रीस्क्रिप्शन व्हायरल झाले आहे आणि त्याबद्दल संबंधित डॉक्टरचे कौतुक केले जात आहे. केरळच्या पल्लकड येथील डॉ. नितिन नारायणन यांचे हे प्रीस्क्रिप्शन आहे. डॉ. नितिन नारायणन हे पलक्कड येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये बालरोगतज्ञ आहेत. त्यांनी आपल्या स्वच्छ हस्ताक्षराने सर्वांनाच चकीत केले आहे. त्यामुळेच त्यांचे प्रीस्क्रिप्शन प्रचंड व्हायरल झाले आहे.

First Published on: June 3, 2023 11:48 AM
Exit mobile version