कुत्रा कुत्रीच दणक्यात लग्न, हजारो वऱ्हाडींच्या उपस्थितीत उडाला बार

कुत्रा कुत्रीच दणक्यात लग्न, हजारो वऱ्हाडींच्या उपस्थितीत उडाला बार

कुत्रा कुत्रीच दणक्यात लग्न, हजारो वऱ्हाडींच्या उपस्थितीत उडाला बार

सध्याच्या काळात अनेकांच्या घरी कुत्रा पाळणे ही एक सामान्य बाब झाली आहे. अगदी त्या कुत्र्याची आपल्या घरातील सदस्याप्रमाणे काळजी देखील घेतली जाते. तर बऱ्याचदा त्याचा वाढदिवस देखील मोठ्या थाटामाटात साजरा केल्याचे आपण पाहिले आहे. पण, चक्क कुत्र्याचे लग्न केल्याची बाब नुकतीच समोर आली आहे. खास बाब म्हणजे तब्बल १ हजार वऱ्हाडींच्या उपस्थितीत त्यांचा लग्नाचा बार उडाला आहे.

इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी घातला घाट

मध्य प्रदेशच्या निवाडी जिल्ह्यातील पुछीकरगुआ गावात राहणाऱ्या मूलचंद नायक यांनी आपल्या रश्मी नावाच्या कुत्रीचे लग्न लावण्याचे ठरवले. याकरता त्यांनी चक्क उत्तर प्रदेशातील बकवा खुर्द येथे राहणाऱ्या अशोक यादवच्या गोलू नावाच्या कुत्र्याशी रश्मी नावाच्या कुत्रीशी लग्न केले. बॅन्डबाजा वरात काढून फटाके वाजवत कुत्रा कुत्रीची मिरवणूक देखील काढण्यात आली.

याकरता लावले लग्न

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “या गावात पाण्याची टंचाई जाणवते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यामुळे गावकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, जर भगवान इंद्रदेवाला प्रसन्न करायचे असेल तर दोन मुक्या प्राण्यांचे लग्न केले तर देव प्रसन्न होतो आणि पावसाचा वर्षाव होऊ शकतो. त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. भगवान इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी हिंदू चालीरितीनुसार कुत्रा कुत्रीच दणक्यात लग्न लावण्यात”, आल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – पाकची घुसखोरी सुरुच, जम्मू-काश्मीरात पुन्हा सापडला बोगदा


First Published on: January 13, 2021 5:28 PM
Exit mobile version