अमानुषपणाची हद्द! हत्तीणीनंतर कुत्र्याचा छळ,टेप करकचून बांधली तोंडाला!

अमानुषपणाची हद्द! हत्तीणीनंतर कुत्र्याचा छळ,टेप करकचून बांधली तोंडाला!

केरळमध्ये कुत्र्याच्या तोंडाला गुंडाळली पट्टी

केरळमध्ये हत्तीणीपाठोपाठ एका कुत्रालाही त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे.  केरळच्या त्रिशूर गावात एका कुत्राचा क्रूरपणे छळ करण्यात आला आहे. या कुत्र्यांच्या तोंडाला करकचून टेप गुंडाळण्यात आली होती. पीपल ऑऱ एनिमल वेलफेअर सर्व्हिसेस च्या सदस्यांनी या कुत्र्याला बघितलं आणि कुत्र्याला वाचवलं. पण तब्बल २ आठवडे ही टेप कुत्र्याच्या तोंडाला होती. तोंडाला पट्टी असल्यामुळे कुत्रा घाबरून लपून बसला होता.

कुत्रा बराच काळ भुकेला आणि तहानलेला होता. कुत्र्याच्या तोंडाची पट्टी काढली आणि त्याला खायला दिले आणि पाणी पाजले. या कुत्र्याचे वय तीन वर्षांचे आहे. याविषयी बोलताना, पीपल ऑऱ एनिमल वेलफेअर सर्व्हिसेस सदस्य म्हणाली की, आम्हाला याची माहिती मिळताच आम्ही तिथे पोहचलो आणि कुत्र्याच्या तोंडावरून टेप काढली. त्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. टेप करकचून बांधल्यामुळे जखमा झाल्या होत्या.

आम्हाला कुत्रा त्रिशूरच्या ओल्लूर जंक्शन येथे सापडला. प्रथम आम्हाला वाटले की, टेपचा एकच रोल कुत्र्याच्या तोंडाला बांधला असेल. पण कुत्र्याच्या तोंडाला टेपचे अनेक थर गुंडाळलेले होते. असे पीपल ऑऱ एनिमल वेलफेअर सर्व्हिसेसचे सचिव रामनंद यांनी सांगितले. कुत्रे न खाता काही दिवस जिवंत राहू शकतात. त्यामुळे कुत्रा जिवंत होता. मात्र तो कमकुवत झाला होता.

याआधी एका भुकेलेल्या गर्भवती हत्तीणीला फटाकेयुक्त अननस खाला दिल्याची अमानुष घटना केरळमध्ये घडली होती. ही हत्तीणी भुकेने त्रस्त झाली होती. त्यामुळे ती अन्नाच्या शोधात खेड्यात फिरत होती. त्याच दरम्यान, काही स्थानिक लोकांनी तिला अननसाद्वारे फाटाके खायला घातले. भुकेने व्याकुळ झालेल्या हत्तीणीने लोकांवर विश्वास ठेवत ते अननस खाल्ले आणि थोड्याच वेळात तिच्या पोटात फटाके फुटले. यातच गर्भाशयात वाढणार्‍या मुलासह तिचा मृत्यू झाला.


हे ही वाचा – तुम्हाला टक्कल आहे? होऊ शकतो कोरोना, आम्ही नाही शास्त्रज्ञ म्हणतायत…


 

First Published on: June 8, 2020 11:32 PM
Exit mobile version