पुण्यातून देशातील २१ शहरांसाठी २० ऑगस्टपासून विमानसेवा होणार सुरु

पुण्यातून देशातील २१ शहरांसाठी २० ऑगस्टपासून विमानसेवा होणार सुरु

पुण्यातून देशातील २१ शहरांसाठी २० ऑगस्टपासून विमानसेवा होणार सुरु

कोरोनामुळे देशातील विमान वाहतुक सेवेवरही मोठा परिणाम झाला होता. मात्र २० ऑगस्टपासून पुण्यातून देशातील २० शहारांसाठी विमान वाहतूक सेवा सुरु होत आहे. त्यामुळे देशाअंतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. इंडिगो या विमान वाहतूक कंपनीकडून ही सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार दर सोमवारी आणि शुक्रवारी पुण्याहून अमृतसरसाठी विमान उड्डाण होईल. पुण्यातील लोहगाव विमानतळावरून २० ऑगस्टपासून अमृतसरसाठी आणि २१ ऑगस्टपासून रांची आणि तिरुअनंतपुरमसाठी विमान सेवा सुरु होईल.

तर कोल्हापूर ते नागपूर विमानसेवा देखील पुन्हा सुरु होणार आहे. याशिवाय कोल्हापूर ते अहमदाबाद ही विमानसेवाही लवकरचं सुरु होईल. यात आठवड्यातून तीनवेळा कोल्हापूरहून अहमदाबादसाठी विमान उड्डाण होईल. या विमान सेवांसाठी ऑनलाईन बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. तर नांदेड ते मुंबई उड्डाण दररोज सुरु राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही विमानसेवा सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यामुळे नांदेडबरोबर जळगाव आणि अहमदाबादपर्यंत ये-जा करण्यासाठी पुन्हा विमानसेवा होणार आहे. यापूर्वी नांदेड ते मुंबई विमान सेवा आठवड्यातून चार दिवस सुरु होती. मात्र अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे ही विमानसेवा  दररोज सुरु करण्यात आली.

यापूर्वी टू जेट विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस सुरु होती. ही सेवा तुर्तास तशीच सुरु ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बाकी चार दिवसांत टु जेटचे विमान सकाळी पावणे दहा वाजता अहमदाबादवरुन निघणार असून ते अकरा वाजता जळगावला पोहचेल. तेच विमान साडे अकरा वाजता जळगावरून निघून पावणे एक वाजता मुंबईत उतरेल.

मुंबईतून १ वाजून २५ मिनिटांनी निघणारं विमान नांदेडमध्ये तीन वाजता येईल. साडे तीन वाजता हे विमान परत एकदा मुंबईच्या दिशेने उड्डाण घेईल. त्यानंतर मुंबई विमानतळावरून पोहचून साडे पाच वाजता जळगावच्या दिशेने उड्डाण घेईल. त्यानंतर ७ वाजून ५ मिनिटांनी जळगाववरून निघून रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी हे विमान अहमदाबादला पोहोचेल.


 

First Published on: August 15, 2021 3:24 PM
Exit mobile version