देशांतर्गत विमान प्रवास महागला, १६ टक्के अधिक भाडे मोजावे लागणार

देशांतर्गत विमान प्रवास महागला, १६ टक्के अधिक भाडे मोजावे लागणार

Air India Handover: एअर इंडियाची मालकी आजपासून टाटा समूहाच्या हाती

देशात सतत होणाऱ्या इंधन दरवाढीपाठोपाठ आता देशांतर्गत विमान प्रवासही महागला आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत विमान प्रवास भाड्याची मर्यादा १३ ते १६ टक्क्यांनी वाढविली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने शुक्रवारी यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. यात ही भाडेवाढ तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही नागरी उड्डाण मंत्रालयाने दिले आहेत. आता किमान भाडे १३ टक्के तर कमाल भाडे १६ टक्के वाढवण्यात आला आहे. ही भाडेवाढ १ जून २०२१ पासून लागू होणार आहे.

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे विमान प्रवाश्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. परिणामी विमान कंपन्यांच्या उत्पन्न देखील मोठ्याप्रमाणात कमी झाले. यामुळे केंद्राने जाहीर केलेला भाडेवाढीचा निर्णय विमान कंपन्यांना आर्थिक संकटातून सावरण्यास मदत करणार आहे.

विमान उड्डाणाच्या वेळेनुसार भाडे निश्चित

देशात विमान उड्डाणाच्या वेळेनुसार ही भाडेवाढ कमी-जास्त प्रमाणात निश्चित केली आहे. ही मर्यादा गतवर्षी दोन महिने चाललेल्या २५ मेपर्यंतच्या लॉकडाऊन उघडण्याच्या वेळीपर्यंत निश्चित केली होती.

नवीन भाडे किती असणार ?

नागरी उड्डयन मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, ४० मिनिटांपर्यंतच्या विमान प्रवासाचे भाडे आता २३०० रुपयांवरून २६०० रुपयांपर्यंत केले आहे. म्हणजे ही १३ टक्के भाडे वाढ करण्यात आली आहे. तर ४० मिनिटांपासून ते ६० मिनिटांच्या विमान प्रवासाचे भाडे आता २९०० रुपयांवरून ३३०० रुपये प्रति व्यक्ती असणार आहे.


अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकच्या बिगर मुस्लिम निर्वासितांच्या नागरिकत्वासाठी केंद्राने मागवले अर्ज


 

First Published on: May 29, 2021 10:05 AM
Exit mobile version