Coronavirus: अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या विमानांवर लावले निर्बंध

Coronavirus: अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या विमानांवर लावले निर्बंध

Coronavirus: अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या विमानांवर लावले निर्बंध

कोरोना विषाणूच्या या संकटात चीन आणि अमेरिकेमधील तणाव वाढताना दिसत आहे. आता अमेरिकेने चीन विरोधात आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ट्रम्प प्रशासनाने चीनहून येणारी सर्व विमान रोखणाचा निर्णय घेतला आहे. १६ जूनपासून हा नियम लागू होणार आहे. बुधवारी अमेरिकेच्या परिवहन विभागाने याची घोषणा केली. या निर्णयानंतर चिनी विमाने अमेरिकेत प्रवेश करू शकणार नाहीत.

जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थामध्ये विमान प्रवासाबद्दल नियम ठरवले होते. तसेच त्याबद्दल यांच्यामध्ये सामंजस्य करारादेखील झाला होता. पण या करारामधल्या नियमांचे पालन करण्यात चीन अपयशी ठरल्यामुळे अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. कोरोनामुळे अमेरिकेतील परिस्थितीनंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडताना दिसत आहेत.

आता १६ जूनपासून चीनवरून येणाऱ्या विमानांना अमेरिकेत उतरता येणार नाही आहे. या महिन्याच्या सुरुवातीला डेल्टा एअरलाईन्स आणि अमेरिकेच्या युनायटेड एअरलाईन्सने चीनला जाणाऱ्या विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली होती. पण आता अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या विमानांवर निर्बंध लावले आहेत. कोरोना काळात अमेरिकेतच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक गंभीर आरोप चीनवर केले आहेत. जागतिक आरोग्य संघटना चीनच्या हातात बाहुल असल्याचा आरोप देखील ट्रम्प यांनी केला होता.


हेही वाचा – Mitron App तात्काळ करा डिलीट, महाराष्ट्र सायबर सेलचे आवाहन


 

First Published on: June 3, 2020 10:33 PM
Exit mobile version