चीनी मालावरील बहिष्काराची बैठक पुढे ढकलली

चीनी मालावरील बहिष्काराची बैठक पुढे ढकलली

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन देशातील नागरिकांना केले होते. याच पार्श्वभूमीवर चीनी मालावर टॅरिफ वाढिची घोषणा करण्यात आली होती. मात्र ही फक्त घोषणाच ठरली असल्याचे चित्र आहे. चीनी मालावर टॅरिफ वाढवण्या संदर्भात अद्याप निर्णय घेतला नसल्यामुळे अद्याप कोणत्याही वस्तूवर टॅरिफ वाढवण्यात आले नाही. काही महत्वाच्या कारणामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती ट्रम्प यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून दिले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनचे पंतप्रधान शी चिनफिंग यांची रविवारी भेट घेतली यानंतर त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

मागील काही वर्षांमध्ये चीन एक विकसीत देश म्हणून प्रगत झाला आहे. यामध्ये चीनच्या निर्यातीचा मोठा वाटा आहे. चीनच्या प्रगतीमुळे इतर देशांनी चीनच्या निर्यातीवर बहिष्कार घालण्याचा निर्यय घेतला होता. यामध्ये अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्पही सहभागी होते. २०० बिलीयन डॉलर्स पर्यंतच्या वस्तूंवर आयातशुल्क १० टक्क्याहून २० टक्के करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला होता.

 

First Published on: February 25, 2019 2:29 PM
Exit mobile version