‘असा’ आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा ३६ तासांचा भारत दौरा!

‘असा’ आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा ३६ तासांचा भारत दौरा!

मेलानिया ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प (सौजन्य - पॉलिटिको)

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलनिया ट्रम्प, मुलगी इव्हान्का ट्रम्प, जावई जँरेड कुशनर यांच्यासह आज भारत दौऱ्यावर आहे. सकाळी ११.४० मिनीटींनी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर आगमन होणार आहे. एकूण ३६ तासांचा हा दौरा असणार आहे. भारताच्या दौऱ्यावर येणारे ट्रम्प सातवे अमेरिकेचे अध्यक्ष असणार आहेत.

असा असेल डोनाल्ड ट्रम्प यांचा दौरा

१. ट्रम्प ११ वाजून ४० मिनीटांनी अहमदाबाद विमानतळावर आगमन होणार आहे.

२. १२.१५ वाजता साबरमती गांधी आश्रमाला भेट देण्याची शक्यता

३. ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुपारी १.०५ वा. अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवरील ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात भाषण होईल.

४. दुपारी ३.३० वा. ट्रम्प आणि मेलानिया आग्य्राला प्रयाण करतील

५. सायंकाळी ५. १५ वा. जगप्रसिद्ध ताज महालला भेट देतील

दिवस दुसरा २५ फेब्रुवारी

१. सकाळी १० वाजता ट्रम्प यांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात येणार

२. साडे दहा वाजता राजघाटवर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पाजंली अर्पण करतील

३. सकाळी ११ वाजता ट्रम्प हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक औपचारिक बैठक

४. मोदींबरोबर दुपारचे जेवण

५. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह डोनाल्ड ट्रम्प सपत्नीक रात्री एकत्र जेवतील. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

६. रात्री १० वाजता ट्रम्प अमेरिकेसाठी रवाना होतील.


हे ही वाचा – साबरमती आश्रमातील वहीत डोनाल्ड ट्रम्प यांनी नक्की लिहीलं काय?


मौर्या हॉटेलमध्ये असेल मुक्काम

दिल्लीत आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये अध्यक्ष ट्रम्प यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. सहा जिल्ह्य़ांतील पोलीस तसेच केंद्रीय सशस्त्र दलांच्या ४० कंपन्या तैनात केल्या आहेत. ६०५ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. चाणक्य या सूटमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली असून यापूर्वी जिमी कार्टर, बिल क्लिंटन, जॉर्ज बुश यांचीही व्यवस्था याच सूटमध्ये केली होती. ट्रम्प यांना सोन्याच्या ताटात जेवण व चांदीच्या पेल्यात चहा दिला जाणार आहे.

मोदींसोबत चर्चा

डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी मोदी हे आपले खास मित्र असल्याचे म्हटले असले तरी भारताने आयात कर लादून अमेरिकेचे नुकसान केल्याचा आरोपही केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील व्यापार तूट कमी करण्याच्या दिशेने उपाययोजना करणे हाच या भेटीचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात येते. संरक्षण, दहशतवाद, विद्युत आदी मुद्द्यांचा चर्चेत समावेश असेल.

First Published on: February 24, 2020 11:37 AM
Exit mobile version