Live Updates: मोटेरा स्टेडियममधून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लाईव्ह!

Live Updates: मोटेरा स्टेडियममधून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लाईव्ह!

डोनाल्ड सपत्नीक भारतात दाखल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात पहिल्यांदाच येणार आहेत. त्यांच्या स्वागतापासून मोदी सरकार जय्यत तयारी केली. नुकतेच डोनाल्ड ट्रम यांचे अहमदाबाद विमानतळावर आगमन झाले आहे. अहमदाबात विमानतळावर मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे.
A view of the sea
Sanchita Thosar

अहमदाबादमधून विमानाने ट्रम्प आग्रा इथं जाणार. 'कॅडिलॅक द बीस्ट' गाडीतून ट्रम्प विमानतळाकडे रवाना

Pravin Wadnere

भारताची खरी ताकद या देशातल्या करोडो लोकांच्या धडकत्या ह्रदयांमध्ये आहे. तुमच्या निश्चयामुळे हा देश घडला आहे. आज मी प्रत्येक भारतीयाला म्हणतो की तुमच्या भूतकाळातून प्रेरणा घ्या, एकत्र या आणि संपूर्ण मानवजातीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रयत्न करूयात – डोनाल्ड ट्रम्प

Pravin Wadnere

या देशाला गंगा, गोल्डन टेम्पल, जामा मस्जिदचे आशीर्वाद लाभले आहेत. हिमालय या देशाच्या पाठिशी आहे – डोनाल्ड ट्रम्प

Pravin Wadnere

पाकिस्तान सरकारसोबत आमची बोलणी सुरू असून त्यांच्या सीमाभागात सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जगभरात सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया नियंत्रित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत – डोनाल्ड ट्रम्प

Pravin Wadnere

मी अमेरिकी नागरिकांच्या वतीने तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो तुम्ही अमेरिकेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल – डोनाल्ड ट्रम्प

First Published on: February 24, 2020 12:08 PM
Exit mobile version