Corona: ‘ही’ ठरू शकतात ट्रम्प यांच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील पराभवाची कारणं

Corona: ‘ही’ ठरू शकतात ट्रम्प यांच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील पराभवाची कारणं

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. एकिकडे कोरोना रुग्णांची अमेरिकेती वाढती संख्या नियंत्रणात कशी आणावी. तर दुसरीकडे राष्ट्रपीतपदाच्या निवडणुकीसाठी स्वतः पुन्हा एकदा योग्य सिद्ध कसे करावे. या दोन्ही आघाडींवर ट्रम्प सध्या अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा अमेरिकेत पाहायला मिळत आहे. आतापर्यंत जगभरात असलेल्या कोरोनाबाधितांपैकी अमेरिकेतील रुग्ण संख्या सगळ्यात जास्त असून यामुळे मृत्यू झालेल्यांचीही संख्या याच देशात सर्वाधिक आहे. त्यामुळे अमेरिका आरोग्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यास कमी पडत आहे का, अशी शंका इतर देशांमधून उपस्थित होत आहे. जर अमेरिका कोरोनाला नियंत्रणात आणू शकली नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांना येत्या निवडणुकीत अपयशाला सामोरे जावे लागेल, असा सूर त्यांच्या विरोधकांनी आळवला आहे.

आर्थिक संकट बनू शकतो महत्त्वाचा मुद्दा 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत सध्या सर्व ५० राज्यांमध्ये लॉकडाऊन घोषिक करण्यात आला आहे. परिणामी, २ कोटींहून अधिक लोकं बेरोजगार झाली आहेत. ते सर्व जागोजागी उभारण्यात आलेल्या फुड बँकवर अवलंबून आहेत. तर दुसरीकडे क्रूड ऑईलच्या किंमतींमध्ये घट झाल्याने देशातील एक हजाराहून अधिक कंपन्यां दिवळखोरीत जाण्याची शक्यत आहे. अमेरिका ज्या प्रकारे चहू बाजूने आर्थिक संकटांत अडकली आहे. त्यातून त्याला बाहेर काढण्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मात्र अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाखांहून अधिक असून मृतांचा आकडा हा ४५ हजार इतका आहे.

हेही वाचा –

Coronavirus Crisis: बेरोजगारी भत्ता मिळवण्यासाठी अमेरिकेत २.६ कोटी लोकांचे अर्ज

First Published on: April 23, 2020 10:21 PM
Exit mobile version