गुगलवर टाईप करा ‘idiot’, पाहा काय येतं

गुगलवर टाईप करा ‘idiot’, पाहा काय येतं

गुगलवर इडियट म्हटल्यावर येतो डोनाल्ड ट्र्म्पचा फोटो

सोशल मीडियावर सर्वात जास्त सर्च होणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्वात पहिला क्रमांक लागतो तो म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा. निवडणुकीपासूनच आपल्या वेगळ्या अंदाज आणि निर्णयांमुळं जगभरात सर्वात जास्त डोनाल्ड ट्रम्पला सर्च करण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प स्वतःला सर्वात जास्त स्मार्ट समजत असले तरीही गुगल मात्र तसं समजत नाही. गुगल सर्चवर तुम्ही ‘Idiot’ हा शब्द टाईप केल्यास, सर्वात पहिला फोटो येतो तो डोनाल्ड ट्रम्पचा. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. अमेरिकन वेबसाईट युएसएनं याबाबतीत छापलेल्या माहितीनुसार ही गोष्ट समोर आली आहे.

ट्रम्पचा फोटो सर्वात वर का?

गुगल सर्चमध्ये सर्वात वर ट्रम्पचा फोटो का? असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. वास्तविक गुगल इमेजवर जेव्हा तुम्ही एखादा कीवर्ड टाईप करता, तेव्हा गुगल तो फोटो दाखवत ज्यामध्ये विशेषतः त्याच शब्दांना मेटा टॅग करण्यात आलेलं असतं. याचा अर्थ हजारो लोकांनी ट्रम्पचा फोटो ‘इडियट’ शब्दासह टॅग करून अपलोड केला आहे. त्यामुळंच ‘Idiot’ हा शब्द टाईप केल्यास सर्वात पहिला फोटो ट्रम्पचा येतो.

गुगल रँकिंगमध्ये मजेदार स्रोत

गुगल रँकिंगमध्ये कदाचित सर्वात जास्त विश्वसनीय स्रोत नसेलही, मात्र मजेदार नक्कीच आहे. या शब्दासह ‘My Mahanagar’ नं देखील सर्च करून पाहिलं आणि हे १०० टक्के खरं आहे.

ट्रम्प का आहे ‘Idiot’?

डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, मात्र तरीही गुगलवर मात्र त्यांना इडियट या श्रेणीमध्ये स्थान मिळालं आहे. वास्तविक हा येणारा फोटो बेबीस्पिटल नावाच्या अमेरिकी ब्लॉग साईटवरील आहे. ही साईट मुख्यत्वे रूढीवाद विचारसरणी आणि त्यासंबंधित पसरवण्यात येणाऱ्या अफवांना मात देण्याचं काम करते. या साईटवर डोनाल्ड ट्रम्प यांना बऱ्याचदा ‘Idiot’ असं संबोधण्यात आलं आहे. या साईटवर त्यांच्या विरोधात बरेच लेख लिहिण्यात आले आहेत. त्यामुळंच गुगल सर्चमध्ये डोनाल्ड ट्रम्प ‘Idiot’ सिद्ध झाले आहेत.

First Published on: July 17, 2018 8:51 PM
Exit mobile version