डॉ रेड्डी लॅबला मोठा झटका! भारतात Sputnik Light लसीच्या तिसर्‍या चाचणीस मान्यता नाही

डॉ रेड्डी लॅबला मोठा झटका! भारतात Sputnik Light लसीच्या तिसर्‍या चाचणीस मान्यता नाही

Sputnik V

रशियन लस Sputnik Light या कोरोना लसीच्या चाचण्यांची भारतात मान्यता नाकारण्यात आली आहे. या लसीला मान्यता न देण्याचं कारण असे सांगितले जात आहे की, केवळ एकच डोस देणारी रशियन Sputnik Light लस ही ही वैज्ञानिकदृष्या काही गोष्टी पूर्ण करीत नाही. त्यामुळे भारतात तिसर्‍या टप्प्यातील या लसीच्या चाचणीसाठी मान्यता देता येणार नसल्याचे भारतातील सर्वोच्च नियामक एजन्सी सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) यांनी सांगितले आहे. मात्र सध्या भारत स्पुतनिक -व्ही या रशियन लसीचा डोस देऊन लसीकरण केले जात आहे. जर या लसीच्या चाचणीला मान्यता मिळाली आणि नंतर या लसीला आपत्कालीन वापरासाठी देखील परवानगी दिली गेली असती तर, ही भारतात देण्यात येणारी एका डोसची पहिली लस ठरली असती.

एएनआयने सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर रेड्डी लॅबने भारतीय औषध नियामक मंडळाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मागितली होती. मात्र ही परवानगी नाकारण्यात आली होती. सीडीएससीओने असे म्हटले की, सिंगल-डोस देण्यात येत असलेल्या या रशियन लसीमध्ये कोणताही वैज्ञानिक तर्क दिसून आला नाही. भारताने यापूर्वीच आपत्कालीन परिस्थितीत रशियाच्या विकसित कोरोना लस स्पुतनिक-व्ही वापरण्यास परवानगी दिली आहे.

असे सांगितले जात आहे की, या लसीचे दोन डोस दिले जात आहेत. परंतु स्पुतनिक लाइटचा एकच डोस पुरेसा आहे. गेल्या वर्षी डॉ. रेड्डी लॅबोरेटरीने रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) शी करार केला होता, ज्या अंतर्गत रशियन-निर्मित डबल-डोस स्पुतनिक व्ही कोविड -१९ लसचे १० कोटी डोस भारतात वितरीत केले जाणार आहेत. स्पुतनिक व्हीनंतर रशियाने स्पुतनिक लाइट अशी सिंगल डोस देण्यात येणारी लस जगासमोर आणली. ही लस रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत गमेल्या नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ एपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी यांनी विकसित केली आहे. एडी 26 चा वापर स्पुतनिक लाईट व्हॅक्सीनमध्ये केला गेला, जो स्पुतनिक व्हीच्या पहिल्या डोसमध्ये वापरला गेला होता.


Covid-19 Vaccine: खुशखबर! भारतीयांचा युरोपात जाण्याचा मार्ग मोकळा; EUचे सात देश आणि स्वित्झर्लंडमध्ये Covishieldला मान्यता
First Published on: July 1, 2021 4:09 PM
Exit mobile version