गोव्यात सार्वजनिक ठिकणी मद्यपान केल्यास लागणार दंड

गोव्यात सार्वजनिक ठिकणी मद्यपान केल्यास लागणार दंड

प्रातिनिधिक फोटो

गोव्यात सार्वजननिक ठिकाणी मद्यपान केल्यास लवकरच दंड लागणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ही घोषणा केली. १५ ऑक्टोबरपासून सार्वजनिक ठिकाणावर मद्यपान केल्यास २,५०० रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल. याच बरोबर गोव्याची राजधानी पणजीत रस्त्यावर पडलेल्या मद्याच्या बाटल्या उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

“लक्षात ठेवा, सर्वजनिक ठिकाण मद्यपान कराल तर दंड ऑगस्टपासून आकारला जाईल. या बद्दलचे परिपत्रक लवकरच काढण्यात येईल. ऑगस्टपूर्वीच या बद्दल नियम काढण्यात येईल आणि १५ तारखेपासून हा नियम लागू होणार आहे. महाविद्यालयात शिकण्यासाठी जाणारी मुले बिअरच्या बाटल्या बाळगतात, जे चुकीचे आहे. मुलांबरोबर मुलींही मद्यपान करत असल्यामुळे हा चिंतेचा विषय आहे. बीचवर बसणारे सर्वजन मद्यपान करत नाही मात्र अधितर येथे मद्यपान करण्यासाठी येतात.”

मद्यपान कमी होण्यासाठी राज्यसरकारने हे पाऊल उचलले आहे. दरवर्षी देश-विदेश येथून लाखोंच्या संख्येत पर्यटक गोव्यात येतात. मद्याच्या नशेत अनेकदा गुन्ह्याचे प्रमाण ही वाढते त्यामुळे हा नियम पर्यटकांवरही लागू होणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे मागील काही महिन्यांपासून कर्करोगाच्या उपचारासाठी देशाबाहेर होते. उपचार पूर्ण करून नुकताच त्यांनी पदभार संभाळला. पर्रिकर यांनी नुकताचे काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

First Published on: July 17, 2018 7:40 PM
Exit mobile version