CoronaVirus:…म्हणून जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर १२ लाख पेटवल्या लाईट्स!

CoronaVirus:…म्हणून जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर १२ लाख पेटवल्या लाईट्स!

CoronaVirus:...म्हणून जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर १२ लाख पेटवल्या लाईट्स!

बुर्ज खलिफाने गरिबांना १२ लाख रेशन देण्याचे लक्ष्य गाठले आहे. कोरोनाच्या संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीसाठी बुर्ज खलिफाने गरिबांच्या मदतीकरिता मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी अनेक जगातील नामांकित संख्यांनी देणगी देण्यासाठी हात पुढे केले. दुबईमध्ये कमी उत्पन्न आणि गरिबांसाठी बुर्ज खलिफाच्या मोहीमेला यश मिळाले आहे. या मोहीमेच्या एका आठवड्यातच त्यांनी १२ लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे आपले लक्ष्य पूर्ण झाल्या कारणाने जगातील सर्वात मोठी इमारत बुर्ज खलिफावर १२ लाख लाईट्स लावण्यात आल्या.

मॅकडोनाल्ड्स, बर्गर किंग तसेच टेक्सास चिकन, वेस्ट झोन आणि मॅक होल्डिंग सारख्या कंपनीने मदत केली आहे. देणगी मिळवण्यााठी एक गाण्याचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. आता मिळालेली देणगी गरिबांना देण्यात येणार आहे. समाजातील सर्व लोक या संकटात गरिबांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत.

दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात मोठी इमारत आहे. आतापर्यंत संयुक्त अरब अमिरातमध्ये १९ हजार ६६१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसंच ६ हजार १२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – CoronaVirus: एअर इंडियाच्या त्या पाच पॉझिटिव्ह वैमानिकांचा अहवाला चुकीचा!


 

First Published on: May 12, 2020 11:05 PM
Exit mobile version