ई-पोर्टलमुळे कुंभारांची दिवाळी उत्साहात

ई-पोर्टलमुळे कुंभारांची दिवाळी उत्साहात

खादीच्या ऑनलाईन विक्रीमुळे या दिवाळीत कुंभार समुदायाला चांगला लाभ झाला आहे. पंतप्रधानांच्या व्होकल फॉर लोकल या घोषणेनुसार यावर्षी खादी ग्रामद्योगतर्फे कुंभारांनी बनवलेले दिव्यांची विक्री यंदा खादी इंडियाच्या ई-पोर्टलवरून करण्यात आली. या दिव्यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली असून, वाढत्या मागणीमुळे दिवाळीमध्ये कुंभारांना दिलासा मिळाला आहे.

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या व्होकल फॉर लोकल घोषणेनुसार यावर्षी प्रथमच दिव्यांची ऑनलाईन आणि स्टोअर्समधून विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगने (केव्हीआयसी) ८ ऑक्टोबरला दिव्यांच्या ऑनलाईन विक्री करण्यास सुरुवात केली. एका महिन्यात १० हजार दिव्यांची ऑनलाईन विक्री झाली. मातीच्या दिव्यांना जास्त मागणी आहे, अगदी १० दिवसांत बहुतांश आकर्षक दिवे विकून झाले. यानंतर केव्हीआयसीने दिव्यांची नवीन डिझाईन सुरु केली, त्यालाही प्रचंड मागणी आहे. दिवाळी जवळ येत आहे, तशी दिव्यांच्या विक्रीत वाढ होत आहे.

केव्हीआयसीने ८ प्रकारच्या दिव्यांचा संच विक्रीस ठेवला आहे. यात ८४ आणि १०८ रुपयादरम्यान १२ दिव्यांचा संच विक्रीसाठी उपलब्ध आहे. केव्हीआयसी कुंभारांनी प्रत्येक दिव्यामागे २ ते ३ रुपयांची कमाई होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. हे दिवे www.khadiindia.gov.in.या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

मातीच्या वस्तूंची ऑनलाईन विक्री ही खर्‍या अर्थाने केव्हीआयसी कुंभारांचे सक्षमीकरण आहे. पूर्वी कुंभारांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री त्या-त्या भागापुरती मर्यादीत होती, पण खादीच्या ई-पोर्टलमुळे त्या देशभर पोहोचत असल्याचे केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी सांगितले.

केव्हीआयसीने कुंभारांना इलेक्ट्रीक चक्र आणि इतर उपकरणांचे कुंभार सशक्तीकरण योजनेअतंर्गत प्रशिक्षण दिले आहे. यामुळे उत्पादन आणि उत्पन्नात ५ पटीने वाढ झाली आहे. आतापर्यंत, केव्हीआयसीने १८,००० इलेक्ट्रीक चक्र वितरीत केली आहेत, ज्याचा ८०,००० पेक्षा अधिक कुंभारांना लाभ झाला आहे.

First Published on: November 5, 2020 7:51 PM
Exit mobile version