राजधानीत सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के

राजधानीत सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के

दिल्लीत भूकंपाचे धक्के

दिल्लीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्लीच्या एनसीआरमध्ये सोमवारी सकाळी ६.२८ वाजता भूकंपाचे धक्के जामवले. भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीपासून ६ किलोमीटरवर मेरठजवळ होता. या भूकंपाची तिव्रता ३.७ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी दिल्लीच्या उत्तर भागामध्ये भूकंपाचे धक्के बसले होते.

सकाळी साडेसहाच्या दरम्यान भूकंपाचे धक्के

दिल्लीमध्ये सोमवारी सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी पश्चिम उत्तर प्रदेशमधील मेरठच्या काही भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. हरियाणाच्या रेवाडी, धारुहेडा, कुंड या भागांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले. तर रविवारी सायंकाळी आलेल्या भूकंपाचा धक्का १० सेकंदापर्यंत जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणाच्या इज्जर जिल्ह्यामध्ये जमीनीपासून १० किलोमीटर खोलीवर होता. ३.८ रिश्टर स्केल या तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले.

दुसऱ्या दिवशीही भूकंपाचे धक्के

या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा जीवितहाणी झाली नसल्याचे वृत्त आहे. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा, गुरुग्राम, फरिदाबाद या भागामध्ये देखील हे भूकंपाचे धक्के जाणवले. सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते.

First Published on: September 10, 2018 10:58 AM
Exit mobile version