Yaas Cyclone: चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पूर्व रेल्वेने केल्या २५ गाड्या रद्द; पहा संपूर्ण यादी

Yaas Cyclone: चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पूर्व रेल्वेने केल्या २५ गाड्या रद्द; पहा संपूर्ण यादी

तौक्ते चक्रीवादळानंतर ‘यास’ चक्रीवादळ धडकणार असल्याने या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता त्यासंबंधित सर्व तयारी सुरू आहे. वायुमार्गासह संरक्षण विमाने एक ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी बचाव पथकं आणि मदत करणारी टीम पाठवित आहेत. तसेच नौदल टीमला सतर्क राहण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. दरम्यान, पूर्व रेल्वेकडून २४ मे ते २९ मे या काळात साधारण २५ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेने हा निर्णयाला एक प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केला आहे, तसेच रद्द केलेल्या सर्व २५ गाड्यांची यादीही या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

बुधवारी यास चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या पूर्व किनारपट्टी भागात धडकवण्याची शक्यता आहे. यापूर्वी साधारण एक आठवड्यापूर्वी पश्चिम किनाऱ्यावर धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने अक्षरशः थैमान घातले होते. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रविवारी असे म्हटले की, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता मोठ्या दबाव क्षेत्रात झाले आहे. त्यामुळे २६ मे रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर अत्यंत तीव्र स्वरूपाचे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. यासह दबाव असणाऱ्या क्षेत्रात सोमवारपर्यंत चक्रीवादळ यास मध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वर्तवली आहे.

भारतीय हवामान खात्याचे डॉ. मृतुंजय महापात्रा यांनी असे सांगितले की, यास २६ मे रोजी संध्याकाळी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या सीमे पार जाईल. हवामान विभागाने या चक्रीवादळाच्या वाऱ्याचा वेग ताशी १५५ ते १६५ किमी ताशी १८५ किमी इतका असण्याचा अंदाज वर्तविला आहे. यासचा प्रवास या वेगाने असल्यास बरेच नुकसान होऊ शकते. हे काही दिवसांपूर्वी आलेल्या चक्रीवादळासारखेच असेल.

First Published on: May 24, 2021 7:31 AM
Exit mobile version