Bypolls : नांदेडच्या देगलूरसह देशातील ३० विधानसभा आणि ३ लोकसभेच्या पोटनिडणुका जाहीर; ३० ऑक्टोबरला मतदान

Bypolls : नांदेडच्या देगलूरसह देशातील ३० विधानसभा आणि ३ लोकसभेच्या पोटनिडणुका जाहीर; ३० ऑक्टोबरला मतदान

निवडणूक आयोगाच्या नेमणुकांमध्ये बदल, अशी असेल आयुक्त ठरवणाऱ्या समितीची रचना

देशातील ३० विधानसभा आणि ३ लोकसभेच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा देखील समावेश आहे. या पोटनिवडणुकांसाठी ३० ऑक्टोबरला मतदान होणार असून २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी असणार आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने आज देशातील विधनसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या. या निवडणुकीसाठी ८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. ११ ऑक्टोबरपर्यंत अर्जांची छाननी केली जाणार असून १३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुभा आहे. यानंतर १७ दिवसांनी म्हणजेच ३० ऑक्टोबर रोजी मतदान होईल, तर २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

या राज्यात विधानसभा निवडणुका 

पश्चिम बंगालमध्ये चार, आसाममध्ये पाच, मेघालय, मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेशात प्रत्येकी तीन जागांवर विधानसभेच्या पोटनिवडणुका होणार आहेत. तर राजस्थान, बिहार आणि कर्नाटकात प्रत्येकी दोन आणि मिझोराम, तेलंगणा, नागालँड, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि हरियाणात प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होणार आहे.

देगलूर विधानसभेची पोटनिवडणूक

देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं ९ एप्रिल २०२१ रोजी निधन झालं. त्यामुळे त्या जागेवर आता पोटनिवडणूक लागली आहे. नांदेडच्या देगलूर विधानसभा मतदारसंघात २००९च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर निवडून आले होते. पण २०१४ च्या निवडणुकीत इथल्या मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात आपलं मत टाकलं. तिथे सुभाष साबणे आमदार म्हणून निवडून आले. २०१९मध्ये काँग्रेसनं हा मतदारसंघ पुन्हा जिंकत रावसाहेब अंतापूरकर आमदार झाले.

 

First Published on: September 28, 2021 2:10 PM
Exit mobile version