भारीच की…! तेलंगणचा पट्याने मक्याचा सालीपासून तयार केले ‘इको फ्रेंडली पेन’

भारीच की…! तेलंगणचा पट्याने मक्याचा सालीपासून तयार केले ‘इको फ्रेंडली पेन’

भारीच की...! तेलंगणचा पट्याने मक्याचा सालीपासून तयार केले 'इको फ्रेंडली पेन'

देशात सर्वत्र कोरोना विषाणूमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.अशातच वातावर बदलामुळे निसर्गात चांगले बदल घडत असून काही चांगल्या गोष्टीही समोर आल्या आहेत. त्याचेच एक उदाहरण सध्या तेलंगणामध्ये पाहायला मिळत आहे. इथल्या एका तरुणाने मक्याचा सालीपासून अशा काही वस्तू बनवल्या आहेत त्याच उपयोग आपल्या दैनंदिन व्यवहारात होत आहे. या तरुणाने चक्क मक्याचा सालीपासून फक्त १० रुपये किंमतीचे पेन तयार केले आहे. त्याचा या प्रयत्नांमुळे प्लास्टिकचा पेन वापराला कायमचा निरोप दिला जाऊ शकतो.

तेलंगणामधील वारंगल गोपाळापुरम गावात वास्तव्यास असणाऱ्या राजू मुप्पारुपू या तरुणाने टाकाऊ मक्याचा टरफलांना जाळण्यापेक्षा त्यांचा सुंदर पर्यावरणपुरक उपयोग केला. या अवलिया आत्तापर्यंत गावात अनेक कमीत कमी खर्चात तयार होणाऱ्या स्त्यावरील लाईटसाठी सौरऊर्जेवर चालणारे सेन्सर आणि बॅटरीवर चालणाऱ्या सायकलसह नविन्यपूर्ण वस्तू तयार केल्या आहेत. २७ एप्रिल रोजी या ३० वर्षीय तरुणाने आपली नवीन कल्पना वापरत मक्याचा सालीपासून लिखाणासाठी चक्क पेनची  निर्मिती केली.

याविषयी राजू यांनी सांगितले की, माझ्या खेडेगावात मोठ्याप्रमाणात शेती होते, अनेक शेतकरी आपल्या शेतात मक्याची पिके घेतात. परंतु या मक्याचा पिकाचा कापणीनंतर त्यावरी साली बाजारात विक्रीसाठी पाठवण्याआधी काढली जातात. या सालींचा कोणताही उपयोग होत नसल्याने ती नंतर जाळली जातात. परंतु या सालींना जाळल्यानंतर होणाऱ्या धुराला रोखण्यासाठी मला यावर काहीतरी पर्यावरण पुरक उपाय सुचवायचा होता असे राजू म्हणाले. यावेळी मला शालेय जीवनात शिकवलेल्या पर्यावरणपूरक कौशल्यांची आठवण झाली. त्यावेळी मी या मक्याचा टाकाऊ सालींचा वापर करुन पेनची रिफिल भरण्यासाठी वापरले जाणारे बाहेरील शेप होल्डर्स बनवण्याचे ठरवले. असे त्यांनी सांगितले. यावर बोलताना राजू पुढे सांगतात की, या पर्यावरणपुरक मक्याचा सालीपासून तयार होणाऱ्या पेनमुळे प्लास्टिक कचरा कमी होण्यात मदत होईल आणि मक्याची साल जाळल्यामुळे होणार धूरही कमी होईल, असेही राजू म्हणाले.

लिखाणासाठी तयार केले मक्याचा सालीपासून पेन

दोन आठवड्यांपूर्वी राजू घरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मक्याचा शेतात गेले होते. यावेळी ते फक्त काही मूठभरा साली घेऊन घरी परतले आणि त्या सालींना ओलसर कपड्याने स्वच्छ केले आणि टेबलवर ठेवत त्या साली सपाट केल्या, मग कटिंग मशीनचा वापर करत त्याला आयताकृती आकारात कापले असे राजू यांनी सांगितले. तसेच या आयताकृती शेपचे योग्य मोजमाप करत दोन्ही टोक एकमेकांना व्यवस्थित जोडत त्यांत पेनाची रिफिल भरली. पर्यावरणास अनुकूल पेनवरील टोपी तयार करण्यासाठी यांनी राजू एक भुशाचा लहान तुकडा गोलाकार कापत तो पेनावर गुंडाळला, आणि तिचा व्यास पेनपेक्षा अधिक मोठा असल्याचे सुनिश्चित केले.

मक्याचा सालीपासून तयार केलेल्या पेनाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राजू यांनी असे अनेक पेन तयार केले आहेत.  एकदा का हा पेन वापरला की या पेनाने नियमित लिहावेसे वाटते असे राजू सांगतात, काही दिवसांपूर्वी असे अनेक पेन तयार केले आणि ते मित्र, शेजारपाजाऱ्यांमध्ये वितरित करण्यास सुरुवात केली. मी स्वत: पेन बनवितो आणि एक पेन पूर्ण करण्यास मला फक्त 10 मिनिटे लागतात. असेही राजू सांगतात.

काही दिवसांपूर्वी जेव्हा राजू यांनी वारंगल महानगरपालिकाचे आयुक्त आयएएस पामेला सत्पथी यांची भेट घेतली तेव्हा त्यांना  मक्याचा सालीपासून तयार केलेला पर्यावरणपूरक पेन आयुक्तांना भेट म्हणून दिला. या पर्यावरणपूरक पेन बनवण्यामागे निसर्गात वाढणाऱ्या प्लास्टिक कचरा रोखणे हा मुख्य उद्देश आहे. दरम्यान राजू यांनी हे एक पेन तयार करण्यासाठी फक्त १० मिनिटे लागत असून १ पेन फक्त १० रुपयांना विकला जात आहे. दरम्यान आत्तापर्यंत १०० पेन तयार केले आहेत. तर आत्ता ९०० पेन तयार करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान तेलंगणा राज्याचा इनोव्हेशन सेलने (टीएसआयसी) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन राजू यांचा अभिनव उपक्रमाचे कौतुक केले असून त्यांना अजून ऑर्डर मिळणे सुरू आहे. जर आपणही राजू यांनी तयार केलेले पर्यावरणपूरक पेन खरेदी करू इच्छित असाल तर आपण 9502855858 वर त्याच्याशी संपर्क साधू शकता.


 

First Published on: May 10, 2021 5:32 PM
Exit mobile version