पाकिस्तानचा कर्दनकाळ सुरु; अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली

पाकिस्तानचा कर्दनकाळ सुरु; अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली

प्रातिनिधिक फोटो

पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. आता तर या अर्थव्यवस्थेने ढासळण्याचा उच्चांक गाठला आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये पहिंल्यादाच पाकिस्तानात इतकी महागाई वाढली आहे. यासोबतच बेरोजगारीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात भर म्हणजे ऑटो सेक्टरमध्ये सर्वाधिक मंदी आली आहे. पाकिस्तानच्या सेंट्रल बँकेने म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याजदर वाढवला आहे. हा व्याजदर १३.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय पाकिस्तानी पैशांची किंमत आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी होत चालली आहे. अमेरिकेच्या एका डॉलरच्या तुलनेने पाकिस्तानचे १६० रुपये झाले आहे.

खाद्य पदार्थांच्या किंमतीत प्रचंड वाढ

पाकिस्तानात खाद्य पदार्थांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. पाकिस्तानमध्ये कांद्याची किंमत ७७.५२ टक्क्यांनी वाढली आहे. टोमॅटो ४६.११ टक्के, कलिंगड ५५.७३ टक्के, निंबू ४३.४६ टक्के आणि साखरची किंमत २६.५३ टक्क्यांनी वाढली आहे. त्याचबरोबर लसून ४९.९९, मूंग ३३. ६५, आंब्यांची किंमत २८.९९ टक्क्यांनी वाढली आहे. यासोबतच इंधनांच्या किंमतीतही वाढ झाली आहे. यामध्ये वायूगॅस ८५.३१ टक्के, पेट्रोल २३.६३ टक्के आणि डिझेलची किंमत २३. ८६ टक्क्यांनी वाढली आहे. बसचे भाडे ५१.१६ टक्क्यांनी, वीज ८.४८ टक्क्यांनी आणि घर भाडे ६.१५ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे पाकिस्तानवर मोठे आर्थिक संकट आले आहे.

ऑटो सेक्टरमध्ये प्रचंड मंदी

पाकिस्तानच्या ऑटो सेक्टरमध्ये प्रचंड मंदी आल्याची पहायला मिळत आहे. पाकिस्तानाचे बातमीपत्र ‘डॉन’ने दिलेल्या माहितीनुसार होंडा अॅटलस कार पाकिस्तानने (एचएसीपी) दहा दिवस कंपनी बंद असणार अशी घोषणा केली आहे. त्यामागे कारणही अगदी तसेच आहे. त्यांच्याजवळ दोन हजार कार विना विक्रीच्या पडल्या आहेत. त्यामुळे या विकल्याशिवाय कारचे आणखीन उत्पादन करणे योग्य नसल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.


हेही वाचा – डुबत्या पाकिस्तानला आयएमएफचा आधार

First Published on: July 17, 2019 12:19 PM
Exit mobile version