लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोसळणार; ५२ टक्के नोकर्‍या जाणार – सीआयआय

लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोसळणार; ५२ टक्के नोकर्‍या जाणार – सीआयआय

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देश २१ दिवस लॉकडाऊन केला आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम होणार आहेत. तसंच ५२ टक्के रोजगार जाणार असल्याची शक्यता भारतीय उद्योग परिसंघाने (सीआयआय – Confederation of Indian Industry) वर्तवली आहे. सीआयआयच्या सुमारे २०० मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी केलेल्या ‘सीआयआय सीईओ स्नॅप पोल’ च्या ऑनलाइन सर्वेक्षणानुसार, मागणी घटल्याने बहुतेक कंपन्यांचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे नोकऱ्या जाऊ शकतात. सर्वेक्षणानुसार, चालू तिमाहीत (एप्रिल-जून) आणि मागील तिमाहीमध्ये (जानेवारी-मार्च) बहुतेक कंपन्यांच्या कमाईच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त तोटा होईल. देशांतर्गत कंपन्यांच्या उत्पन्न आणि नफ्यात होणाऱ्या तोट्याचा परिणाम देशाच्या आर्थिक वाढीच्या दरावरही होईल. ५२ टक्के नोकर्‍या जाऊ शकतात. ४७ टक्के कंपन्यांमध्ये १५ टक्केपेक्षा कमी रोजगार अपेक्षित आहेत.


हेही वाचा – Coronavirus: अमेरिकेत वाघाला कोरोनाची लागण


उद्योगांवर खोलवर परिणाम

८० टक्के कंपन्यांनी असा दावा केला आहे की सध्या त्यांचा माल असाच पडून आहे. तथापि, लॉकडाउन संपल्यानंतरही मागणी कमी होण्याची शक्यता दर्शविणार्‍या ४० टक्के कंपन्यांकडून त्यांचा स्टॉक लॉकडाऊन संपल्यानंतरही एका महिन्यासाठी पुरेसा असेल अशी अपेक्षा आहे. सीआयआयचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी म्हणाले की सरकार उद्योगासाठी वित्तीय प्रोत्साहन पॅकेज जाहीर करेल आणि ते फास्ट ट्रॅक मोडवर लागू करू शकता येईल. कारण लॉकडाऊनच्या अचानक अंमलबजावणीचा उद्योगांच्या कारभारावर खोलवर परिणाम झाला आहे.

 

First Published on: April 6, 2020 9:54 AM
Exit mobile version