ईडीची नीरव मोदीविरोधात चार्जशीट दाखल

ईडीची नीरव मोदीविरोधात चार्जशीट दाखल

नीरव मोदी

पंजाब नॅशनल बँकेचे १३ हजार कोटी बुडवून पलायन करणाऱ्या नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालय विभागाने (ईडी) आज पहिल्यांदा आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने १२ हजार पानांची चार्जशीट दाखल केली आहे. कोट्यवधीचा आर्थिक घोटाळा करणाऱ्या मोदीविरोधात विशेष फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिन्यात पीएनबी घोटाळ्यांतर्गत सीबीआयने २ चार्जशीट दाखल केल्या होत्या. परंतु नीरव मोदीविरोधात चार्जशीट दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणाऱ्या आयकर विभागाच्या आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांची केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी केली जाणार आहे. याशिवाय प्रत्यक्ष कर बोर्डाचे अध्यक्ष सुशील चंदा यांचीही चौकशी होणार आहे.
पीएनबी कर्ज घोटाळा समोर आल्यानंतर आयकर विभागानं नीरव मोदीच्या शोरुम आणि घरांवर धाडी टाकल्या होत्या. त्यावेळेस नीरव मोदीनं केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती आयकर विभागाच्या हाती लागली.

दरम्यान, नीरव मोदी लंडनमध्ये असल्याची माहिती ईडीने दिली आहे. नीरव मोदीचा पासपोर्ट जप्त करण्यात आला असला तरी सध्या तो सिंगापुरच्या पासपोर्टवर विदेशात मुक्तपणे फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा भाऊ निशाल मोदी आणि बहीण पुर्वी मेहता यांच्याकडे बेल्जियमचे पासपोर्ट आहेत.

 

First Published on: May 24, 2018 1:29 PM
Exit mobile version