पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार; उपअधीक्षकासह ८ पोलिसांचा मृत्यू

पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार; उपअधीक्षकासह ८ पोलिसांचा मृत्यू

पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार; उपअधीक्षकासह ८ पोलिसांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये पोलीस पथकावर झालेल्या अंदाधुंद गोळीबारात उपअधीक्षकासह आठ पोलिसांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कानपूर येथे पोलीस विकास दुबे या गुंडाला अटक करण्यास गेले असता ही चकमक उडाली. दरम्यान, विकास दुबे याच्यावर ६० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलीस बिकरु गावात विकास दुबेच्या शोधात गेले असता गुंडांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

नेमके काय घडले?

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांचे पथक विकास दुबेचा शोध घेत होते. त्यानुसार पोलीस त्याच्याजवळ पोहोचणार इतक्यात इमारतीवरुन पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात पोलीस उपअधीक्षक देवेंद्र मिश्रा यांच्यासह तीन पोलीस उपनिरीक्षण आणि चार कॉन्स्टेबल यांचा मृत्यू झाला आहे.

आरोपींविरोधात कठोर कारवाई करा

या घटने प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शहीद झालेल्या पोलिसांसाठी शोक व्यक्त केला आहे. सोबतच आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील दिले आहेत.


हेही वाचा – केंद्र सरकारने जारी केल्या होम आयसोलेशनसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना


 

First Published on: July 3, 2020 8:48 AM
Exit mobile version