हाँगकाँगमधील ‘त्या’ करोना संशयित कुत्र्याचा मृत्यू

हाँगकाँगमधील ‘त्या’ करोना संशयित कुत्र्याचा मृत्यू

करोनाची लागण झाल्याच्या संशयावरून क्वारंनटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या हाँगकाँगमधील १७ वर्षीय कुत्र्याचा आज मृत्यू झाला. त्याला करोनाची लागण झाली नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर शनिवारी घरी सोडण्यात आले. पण घरी आल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. आठवडाभर कुटुंबापासून व मालकापासून दूर राहील्याने तो तणावाखाली होता. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे हाँगकाँगच्या अॅग्रीकल्चर फिशरीज अँड कन्झर्वशन प्राणीतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

फेब्रुवारी महिन्यात कुत्र्याच्या मालकाला करोनाची लागण झाल्याचे निदान झाले. त्यानंतर घरातील कुत्रा आजारी पडल्याने व त्याच्यात करोना सदृश लक्षणे दिसत असल्याने त्याला क्वारनटाईन करण्यात आले. गेल्याच आठवड्यात त्याचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. त्यानंतर शनिवारी त्याला घरी पाठवण्यात आले. पण मालकापासून व कुटुंबीयांपासून दूर राहील्याने त्याला मानसिक धक्का बसला होता.  यामुळे घरी येताच त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर त्याला डॉक्टरकडे नेण्यात आले. पण अखेर आज बुधवारी त्याचा मृत्यू झाला.

First Published on: March 18, 2020 2:19 PM
Exit mobile version