पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणूक आयोगाची क्लिन चीट

पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणूक आयोगाची क्लिन चीट

‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींची घोषणा

निवडणूक आयोगाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वर्धा येथील भाषणाबाबत क्लिन चीट दिली आहे. मोदींनी निवडणूक आचारसहिंतेचे कोणतेही उल्लंघन केले नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी यांचे वर्ध्यातील भाषण तपासले असता त्यात आचारसंहितेचा भंग होईल, असे काहीही आक्षेपार्ह वक्तव्य सापडले नसल्याचे मत आयोगाने व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्धा येथे महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा झाली होती. त्या सभेत मोदींनी शहिदांच्या स्मृतींची आठवण ठेवून मतदान करावे, असे सांगितले होते. तसेच अमित शाह यांनी देखील अशाच प्रकारचे आवाहन केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज (मंगळवारी) सुनावणी घेण्यात आली. या याचिकेची पुढील सुनावणी २ मे रोजी होणार आहे. तत्पूर्वी आज आयोगाने मोदींच्या भाषणात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 

 

First Published on: April 30, 2019 9:46 PM
Exit mobile version